Hardik Pandya : टीम इंडियात ऋषभ पंतची उणीव भासेल? हार्दिक पंड्या म्हणाला…..

"पंत महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र आताची परिस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. टीममध्ये पंत असता तर फार फरक पडला असता.

Hardik Pandya : टीम इंडियात ऋषभ पंतची उणीव भासेल? हार्दिक पंड्या म्हणाला.....
Image Credit source: ऋषभ पंत ट्विटर
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 9:15 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील (Ind vs SL) टी 20 मालिकेला मंगळवार 3 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) या मालिकेत खेळणार आहे. हार्दिकने या मालिकेच्या पूर्वसंध्येला ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अपघाताबाबत आणि त्याच्या अनुपस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पंत नसल्याने निश्चितच टीमच्या बॅलेन्सवर परिणाम होईल. तर पंत लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी पांड्या पार्थना करत आहे. (team india captain hardik pandya on rishabh pant ind vs sl 1st t20i at mumbai wankhede stadium press conference)

पंतचा काही दिवसांपूर्वी उत्तरांखडला आपल्या घरी रुडकी इथे जाताना भीषण अपघात झाला. पंतच्या गाडीला शुक्रवारी दिल्ली-देहरादून महामार्गावर अपघात झाला. भरधाव गाडी डिव्हायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. पंत सुदैवाने या अपघातून वाचला. मात्र त्याला जबर मार लागलाय. पंतला विविध ठिकाणी दुखापत झालीय. त्यानंतर पंतला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या पंतची तब्येत स्थिर आहे.

पंत काय म्हणाला?

हे सुद्धा वाचा

गुडघा, पाय, टाच आणि अंगठ्याला अपघातात जबर मार लागलाय. त्यामुळे पंतला पुढील किमान 6 महिनेतरी क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. याबाबत हर्दिकला पंतबाबत विचारलं. तेव्हा हार्दिकने पंत लवकरात लवकर बरा व्हावा, अशी पार्थना केली. “जे झालं ते फार वाईट झालं. जे झालं ते कुणाच्याच हातात नव्हतं. एक टीम म्हणून पंत लवकर बरा व्हावा. आमच्या पार्थना पंतसोबत आहे”, असं हार्दिक म्हणाला. हार्दिक पत्रकारांशी बोलत होता.

“पंत महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र आताची परिस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. टीममध्ये पंत असता तर फार फरक पडला असता. पंतच्या गैरहजेरीत अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्ही नियंत्रित करु शकत नाही. पंतच्या अनुपस्थितीत ज्यांना संधी मिळाली त्यांनी या संधीचं पूर्ण फायदा करुन घ्यावा”, असं हार्दिक म्हणाला. पंतची श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.