AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : दुसरा सामना, दुसरं शतक, कॅप्टन Shubman Gill चा धमाका, इंग्लंड विरुद्ध कडक खेळी

Shubman Gill Century : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड विरूद्धच्या दुसर्‍या सामन्यात बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबेस्टन मैदानात शतक झळकावलं आहे.

ENG vs IND : दुसरा सामना, दुसरं शतक, कॅप्टन Shubman Gill चा धमाका, इंग्लंड विरुद्ध कडक खेळी
Shubman Gill CenturyImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 02, 2025 | 11:42 PM
Share

टीम इंडियाचा युवा कॅप्टन शुबमन गिल याने बर्मिंगहॅममधील एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी जबरदस्त शतक ठोकलं आहे. टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वाल लीड्सनंतर एजबेस्टनमध्ये शतक करण्यात अपयशी ठरला. यशस्वी 87 धावांवर बाद झाला. त्यामुळे यशस्वी सलग दुसऱ्या शतकापासून 13 धावा दूर राहिला. मात्र कर्णधार शुबमन गिल याने यशस्वीसारखी चूक केली नाही. शुबमनने शतक ठोकत चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. शुबमनचं हे कर्णधार म्हणून सलग दुसरं शतक ठरलं. तसेच शुबमनचं कसोटी कारकीर्दीतील हे एकूण सातवं तर इंग्लंड विरुद्धचं चौथं शतक ठरंलं.

चौकार ठोकून शतक पूर्ण

शुबमनने 125 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शुबमनने त्यानंतर 74 चेंडूत पुढील 50 धावा जोडल्या. जो रुट याने टाकलेल्या 80 व्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर शुबमनने चौकार ठोकला आणि शतक पूर्ण केलं. शुबमनने अशाप्रकारे 199 बॉलमध्ये नॉट आऊट 102 रन्स केल्या.  शुबमनने 51.26 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. शुबमनने 102 पैकी 44 धावा या चौकारांच्या मदतीने केल्या. शुबमनने या खेळीत 11 चौकार लगावले.

शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतून कर्णधार म्हणून पदार्पण केलं. शुबमनने लीड्समधील पहिल्याच डावात शतक केलं. शुबमनने त्या सामन्यात 227 चेंडूत 147 धावा केल्या. शुबमनच्या या खेळीत 19 चौकार आणि 1 षटकारचा समावेश होता. त्यानंतर शुबमनने लीड्सच्या कामगिरीची पुनरावृत्ती एजबेस्टनमध्ये करुन दाखवली आणि सलग दुसरं शतक ठोकलं. शुबमनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे 16 वं शतक ठरलंय.

विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

दरम्यान शुबमनने या खेळीसह आणखी एक कारनामा केला आहे. शुबमनने माजी कर्णधार विराट कोहली याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुबमन एजबेस्टनच्या मैदानात शतक करणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी विराट कोहली याने अशी कामगिरी केली होती. विराटने 2018 साली हा कारनामा केला होता.

कर्णधार शुबमनची शतकी खेळी

दरम्यान त्याआधी यशस्वीकडेही शुबमनसारखीच कामगिरी करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने यशस्वीला आऊट करत शतक करण्यापासून रोखलं. बेन स्टोक्सने यशस्वीला शॉर्ट आणि वाईड बॉलवर विकेटकीपर जेमी स्मिथ याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वीने 107 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा