
टीम इंडियाचा युवा कॅप्टन शुबमन गिल याने बर्मिंगहॅममधील एजबेस्टनमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी जबरदस्त शतक ठोकलं आहे. टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वाल लीड्सनंतर एजबेस्टनमध्ये शतक करण्यात अपयशी ठरला. यशस्वी 87 धावांवर बाद झाला. त्यामुळे यशस्वी सलग दुसऱ्या शतकापासून 13 धावा दूर राहिला. मात्र कर्णधार शुबमन गिल याने यशस्वीसारखी चूक केली नाही. शुबमनने शतक ठोकत चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. शुबमनचं हे कर्णधार म्हणून सलग दुसरं शतक ठरलं. तसेच शुबमनचं कसोटी कारकीर्दीतील हे एकूण सातवं तर इंग्लंड विरुद्धचं चौथं शतक ठरंलं.
शुबमनने 125 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शुबमनने त्यानंतर 74 चेंडूत पुढील 50 धावा जोडल्या. जो रुट याने टाकलेल्या 80 व्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर शुबमनने चौकार ठोकला आणि शतक पूर्ण केलं. शुबमनने अशाप्रकारे 199 बॉलमध्ये नॉट आऊट 102 रन्स केल्या. शुबमनने 51.26 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. शुबमनने 102 पैकी 44 धावा या चौकारांच्या मदतीने केल्या. शुबमनने या खेळीत 11 चौकार लगावले.
शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतून कर्णधार म्हणून पदार्पण केलं. शुबमनने लीड्समधील पहिल्याच डावात शतक केलं. शुबमनने त्या सामन्यात 227 चेंडूत 147 धावा केल्या. शुबमनच्या या खेळीत 19 चौकार आणि 1 षटकारचा समावेश होता. त्यानंतर शुबमनने लीड्सच्या कामगिरीची पुनरावृत्ती एजबेस्टनमध्ये करुन दाखवली आणि सलग दुसरं शतक ठोकलं. शुबमनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे 16 वं शतक ठरलंय.
दरम्यान शुबमनने या खेळीसह आणखी एक कारनामा केला आहे. शुबमनने माजी कर्णधार विराट कोहली याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुबमन एजबेस्टनच्या मैदानात शतक करणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी विराट कोहली याने अशी कामगिरी केली होती. विराटने 2018 साली हा कारनामा केला होता.
कर्णधार शुबमनची शतकी खेळी
HUNDRED in Headingley 💯
HUNDRED in Edgbaston 💯
Captain Shubman Gill gets his 7th Test Century 🤩
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/tiMIKgi0k0
— BCCI (@BCCI) July 2, 2025
दरम्यान त्याआधी यशस्वीकडेही शुबमनसारखीच कामगिरी करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने यशस्वीला आऊट करत शतक करण्यापासून रोखलं. बेन स्टोक्सने यशस्वीला शॉर्ट आणि वाईड बॉलवर विकेटकीपर जेमी स्मिथ याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वीने 107 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या.