AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dinesh Karthik : 6,6,6,6,6,6 डीवाय पाटीलकडून खेळताना दिनेश कार्तिकने समोरच्या टीमला जाम धुतलं

Dinesh Karthik : कॉमेंट्री बॉक्समध्ये बसत असला, तरी दिनेश कार्तिकच्या बॅटिंगमध्ये अजूनही तोच धाक आहे. अलीकडेच एका स्थानिक टुर्नामेंटमध्ये दिनेश कार्तिकच्या बॅटिंगची दहशत दिसून आली.

Dinesh Karthik : 6,6,6,6,6,6 डीवाय पाटीलकडून खेळताना दिनेश कार्तिकने समोरच्या टीमला जाम धुतलं
Dinesh Karthik Image Credit source: instagram
| Updated on: Feb 22, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई : वाढत्या वयामुळे दिनेश कार्तिकला पुन्हा टीम इंडियात संधी मिळणार नाही. IPL च्या मागच्या सीजनमध्ये त्याने दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालं. पण तो विशेष प्रभावी कामगिरी करु शकला नाही. दिनेश कार्तिक आता मैदानाऐवजी कॉमेंट्री बॉक्समध्ये जास्त दिसतो. कॉमेंट्री बॉक्समधून तो एक्सपर्ट ओपिनियन देत असतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसत असला, तरी दिनेश कार्तिकच्या बॅटिंगमध्ये अजूनही तोच धाक आहे. अलीकडेच एका स्थानिक टुर्नामेंटमध्ये दिनेश कार्तिकच्या बॅटिंगची दहशत दिसून आली.

दिनेशच्या बॅटिंगमुळे RBI ची टीम हरली

दिनेश कार्तिक मंगळवारी एका टुर्नामेंटमध्ये कमालीची इनिंग खेळला. त्याने 38 चेंडूत नाबाद 75 धावा फटकावल्या. दिनेश कार्तिक डिवाय पाटील ग्रुप बी कडून खेळत होता. कार्तिक 6 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने तुफान इनिंग खेळला. त्याच्या याच इनिंगमुळे टीमची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचली. या मॅचमध्ये RBI चा 25 धावांनी पराभव झाला.

ब्रेकमध्ये धावांच पाऊस

दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कॉमेंट्री करतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात तो कॉमेंटेटरच्या रोलमध्ये होता. दुसरी टेस्ट संपल्यानंतर तो पुन्हा मैदानात परतला. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरु होणार आहे. म्हणजे सात ते आठ दिवसांचा वेळ आहे. या दरम्यान कार्तिकने स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडला. आरसीबीसाठी चांगली बातमी

दिनेश कार्तिकने डिवाय पाटील टुर्नामेंटमध्ये धावा बनवल्या. ही आरसीबीसाठी चांगली बातमी आहे. 31 मार्चपासून आयपीएलची सुरुवात होतेय. कार्तिकचा फॉर्म आरसीबीच्या उपयोगाला येईल. दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये प्रभावी कामगिरी केली नाही. वाढत वय लक्षात घेऊन त्याला नंतर टीममधून ड्रॉप करण्यात आलं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.