AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar : ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर आणि त्यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे सध्या टीम इंडियासोबत बांगलादेश दौऱ्यावर आहेत.

Sunil Gavaskar :  'लिटील मास्टर' सुनील गावसकर आणि त्यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
Sunil Gavaskar Image Credit source: फाईल फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 25, 2022 | 8:59 PM
Share

Sunil Gavaskar Mother Passed Away : टीम इंडियाचे माजी कर्णधार, 1983 च्या वर्ल्ड कप संघाचे सदस्य आणि समालोचक सर्वांचे लाडके ‘लिटील मास्टर’ अर्थात सुनील गावसकर यांच्या चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. सुनील गावस्कर (Littile Master Sunil Gavaskar) यांच्या मातोश्री मीनल गावसकर (Meenal Gavaskar) यांचं दीर्घ आजाराने वयाच्या 95 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी निधन झालं आहे. तर गावसकर सध्या टीम इंडियासोबत बांगलादेश दौऱ्यावर आहेत. (team india former captain and 1983 world cup winner member sunil gavaskar mother passed away)

मीनल गावसकर या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. यामुळे सुनील गावसकर हे आयपीएल 15 व्या मोसमातील नॉकआऊट राउंडमधील मॅचेसमध्ये कॉमेंट्रीसाठी हजर राहु शकले नव्हते. त्यावेळेस गावसकर हे आईला पाहण्यासाठी मुंबईला निघून आले.

वडिलानंतर मामांना गमावलं आता मातृछत्र हरपलं

दरम्यान सुनील गावसकर यांच्या वडिलांचं निधन वयाच्या 88 व्या वर्षी 30 मे 2012 रोजी झालं. त्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू आणि सनुील यांचे मामा माधव मंत्री यांनी 23 मे 2014 साली वयाच्या 93 वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

गावसकर यांची क्रिकेट कारकीर्द

गावसकर यांनी टीम इंडियाचं 125 कसोटी आणि 108 एकदिवस सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. गावसकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 27 अर्धशतकांसह 3 हजार 392 धावा केल्या आहेत. तर कसोटीतील 125 सामन्यांतील 214 डावांमध्ये 21.12 च्या सरासरीने 4 खणखणीत द्विशतक आणि 34 शतकांसह 10 हजार 122 धावा ठोकल्या आहेत.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?