Dinesh Karthik निवृत्तीनंतर पुन्हा खेळण्यासाठी तयार, कॅप्टन्सीही मिळाली
Indian Cricket Team: टीम इंडियाचा माजी विकेटकीपर फलंदाज निवृत्तीनंतर पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. जाणून घ्या कोण आहे तो?

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी विकेटकीपर बॅट्समन निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे या दिग्गजाला कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. या दिग्गज विकेटकीपर फलंदाजाने भारताला 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आता हा क्रिकेटर पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
टीम इंडियाचा दिनेश कार्तिक याने 1 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. कार्तिकने त्याचा अखेरचा सामना हा आयपीएलच्या 17 व्या मोसमात खेळला. त्यानंतर कार्तिकने क्रिकेटला अखेरचा निरोप दिला. मात्र त्याने निवृत्तीबाबतची अधिकृत घोषणा ही 1 जून रोजी केली. त्यानंतर कार्तिक टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत समालोचकाच्या भूमिकेत दिसला. आता कार्तिक लिजेंड्स क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू हे लिजेंड्स लीग स्पर्धेत खेळतात.
दिनेश कार्तिक या स्पर्धेत साउथर्न सुपर स्टार्स टीमकडून या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. कार्तिककडेच या संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. कार्तिकला क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. तसेच त्याने कॅप्टन्सीही केली आहे. त्यामुळे या स्पर्धेत साउथर्न सुपर स्टार्सला कार्तिकच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. तसेच काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन शिखर धवन यानेही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर धवनने काही तासातच चाहत्यांना गूड न्यूज दिली. धवनही कार्तिकप्रमाणे लिजेंड्स क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे.
कॅप्टन दिनेश कार्तिक लिजेंड्स लीग स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज
Big news for our fans 👀@DineshKarthik joins the #LegendsLeagueCricket and will take charge as captain of the @SSuper_Stars
Get ready for a blockbuster season 💥#BossLogonKaGame #LLCseason3 #DK #DineshKarthik pic.twitter.com/k3iCcCJmjr
— Legends League Cricket (@llct20) August 27, 2024
दिनेश कार्तिकची कारकीर्द
दरम्यान दिनेश कार्तिकने टीम इंडियाचं 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 60 टी20i सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. दिनेशने कसोटी क्रिकेटमध्ये 1 हजार 25, वनडेमध्ये 1 हजार 752 तर टी20iमध्ये 686 धावा केल्या आहेत. तसेच कार्तिकने आयपीएल कारकीर्दीतील 257 सामन्यांमध्ये 22 अर्धशतकांसह 4 हजार 842 धावा केल्या आहेत.
