AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी 10 सामन्यात टीम इंडियाची लिटमस टेस्ट, दोन मालिकेतून ठरणार अंतिम संघ

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेसाठी आता फक्त अडीच महिन्यांचा अवधी आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ 10 टी20 सामने खेळणार आहे. या मालिकेतून टी20 वर्ल्डकपसाठीचा अंतिम संघ ठरवला जाईल.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी 10 सामन्यात टीम इंडियाची लिटमस टेस्ट, दोन मालिकेतून ठरणार अंतिम संघ
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी 10 सामन्यात टीम इंडियाची लिटमस टेस्ट, दोन मालिकेतून ठरणार अंतिम संघImage Credit source: PTI
| Updated on: Nov 11, 2025 | 8:43 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार असून अडीच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. भारतीय संघ गतविजेता असून जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेची तयारी करण्यासाठी भारताकडे एकूण 10 सामने आहेत. या सामन्यात भारताची लिटमस टेस्ट होणार आहे. टी20 वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर 10 सामने खेळेल. दोन मालिकेत प्रत्येकी 5 सामने असतील. या दोन मालिकांकडे मिनी वर्ल्डकप म्हणून पाहीलं जात आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडशी सामना करेल. भारतीय संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी20 सामने खेळेल. त्यानंतर जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल.

दुसरीकडे, भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टी20 विश्वचषकाच्या तयारीबाबत असमाधान व्यक्त केलं आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, संघ अद्याप टी20 विश्वचषकासाठी इच्छित पातळीपर्यंत पोहोचलेला नाही.संघाकडे अजूनही चांगली तयारी करण्यासाठी बराच वेळ आहे. म्हणजेच या दहा सामन्यात भारतीय संघाला आपली क्षमता सिद्ध करून दाखवावी लागेल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेचे वेळापत्रक:

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी20 सामना: 9 डिसेंबर – बाराबती स्टेडियम, कटक
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी20 सामना: 11 डिसेंबर – मुल्लानपूर, एमवायसी स्टेडियम
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20: 14 डिसेंबर – HPCA स्टेडियम, धरमशाला
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी20 सामना: 17 डिसेंबर – लखनऊ, एकाना स्टेडियम
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा टी20 सामना: 19 डिसेंबर – अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक:

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी20 सामना: 21 जानेवारी – नागपूर, व्हीसीए स्टेडियम
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना: 23 जानेवारी – शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम, रायपूर
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी20 सामना: 25 जानेवारी – गुवाहाटी, एसीए स्टेडियम
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा टी20 सामना: 28 जानेवारी – विशाखापट्टणम, डॉ. वायएसआर स्टेडियम
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचवा टी20 सामना: 31 जानेवारी – तिरुवनंतपुरम, ग्रीनफील्ड स्टेडियम

टी20 वर्ल्डकप स्पर्धा आहे तशीच होणार

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद येथे आयोजन केलं जाणार आहे. तर श्रीलंकेत कोलंबोमधील दोन आणि कँडीमधील एक स्टेडियम या विश्वचषकासाठी निवडण्यात आले आहे. ही स्पर्धा 2024 प्रमाणेच आयोजित केली जाईल. सर्व 20 संघांना प्रत्येकी पाच अशा चार गटांमध्ये विभागले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 फेरीत प्रवेश करतील आणि तेथून चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....