AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : हेड कोच गौतम गंभीर इंग्लंडमध्ये केव्हा येणार? असा आहे ट्रॅव्हल प्लान

Team India Head Coach Gautam Gambhir : भारतीय कसोटी संघाचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईंची प्रकृती बिघडल्याने मायदेशात परतले होते. मात्र आता ते टीम इंडियासोबत केव्हा जोडले जाणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

ENG vs IND : हेड कोच गौतम गंभीर इंग्लंडमध्ये केव्हा येणार? असा आहे ट्रॅव्हल प्लान
Gautam Gambhir Team India Head CoachImage Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Jun 16, 2025 | 3:49 PM
Share

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने इंग्लंडवरुन भारतात परतावं लागलं होतं. मात्र आता त्यांच्या मातोश्रींची प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर गौतम गंभीर पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर सोमवारी 16 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. मात्र गंभीरचा ट्रॅव्हल प्लान काय आहे? गंभीर टीम इंडियासह हेंडिंगलमध्ये केव्हापर्यंत जोडले जाणार? या सर्व प्रश्नांची उत्तर सविस्तर जाणून घेऊयात.

असा आहे ट्रॅव्हल प्लान

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीर 16 जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होतील. गंभीर भारतातून सर्वातआधी दुबईला जातील. गंभीर त्यानंतर दुबईहून बर्मिंगघमला जातील. मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर बर्मिंगघमला पोहचल्यानंतर पुढील प्रवास रस्ते मार्गाने करतील. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. सलामीचा सामना हा हेडिंग्ले लीड्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए टीम यांच्यातील 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरिज 0-0 ने बरोबरीत राहिली. त्यानतंर इंडिया ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यात इन्ट्रा स्क्वॉड सामन्यानंतर खेळाडू 1 दिवस विश्रांती करतील. त्यानंतर 17 जून रोजी टीम इंडिया हेडिंग्ले इथे रवाना होणार आहे. हेड कोच गंभीर तिथेच टीम इंडियासह जोडले जातील.

गौतम गंभीर यांच्या मातोश्री सीमा गंभीर यांना 11 जून रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. सीमा गंभीर यांना त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गौतम गंभीर यांना याबाबतची माहिती मिळताच ते तातडीने मायदेशी परतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीमा गंभीर यांना अतिदक्षता विभागात (Icu) ठेवण्यात आलं आहे. मात्र त्यानंतरही गंभीर 17 जूनपर्यंत टीम इंडियासह जोडले जाणार आहेत.

5 सामने आणि 1 मालिका

दरम्यान टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा याच्या कसोटी निवृत्तीनंतर शुबमन गिल याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुबमनची कॅप्टन म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे. तसेच टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच सीरिज असणार आहे. सोबतच आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांशिवाय टीम इंडियाची युवा ब्रिगेड इंग्लंड विरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांची बारीक नजर असणार आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....