AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan : 12 चौकार-1 षटकार, ईशान किशनचा इंग्लंडमध्ये धमाका, पहिल्याच सामन्यात मोठी खेळी

Ishan Kishan County Debut : ईशान किशन याने काउंटी डेब्यूत धमाका उडवून दिलाय. ईशानने इंग्लंडमध्ये 12 चौकार आणि 1 षटकारासह 87 धावांची खेळी केली.

Ishan Kishan : 12 चौकार-1 षटकार, ईशान किशनचा इंग्लंडमध्ये धमाका, पहिल्याच सामन्यात मोठी खेळी
Ishan Kishan County DebutImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 23, 2025 | 7:21 PM
Share

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन गेल्या अनेक वर्षांपासून कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. मात्र त्याची प्रतिक्षा अजूनही कायमच आहे. ईशानने टीम इंडियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2023 साली खेळला होता. ईशानची इंडिया ए टीममध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र ईशानला इंग्लंड लायन्स विरूद्धच्या 2 अनऑफिशियल टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर ईशाने इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला.

ईशाने नॉटिंघमशरसह 2 सामन्यांचा करार केला. त्यानंतर ईशानने यॉर्कशायर विरुद्ध 22 जून पदार्पण केलं. ईशान पदार्पणात अविस्मरणीय आणि उल्लेखनीय कामगिरी करण्यात यशस्वी ठरला.  ईशानने ट्रेंट ब्रिजमध्ये कडक खेळी केली.

ईशानने काउंटी चॅम्पियनशीप डेब्यूत प्रतिभा दाखवून दिली. ईशानची इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईशानने पहिल्या डावात 98 चेंडूत 87 धावांची खेळी केली. ईशानच्या या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकारचा समावेश होता. ईशानला पदार्पणात शतक करण्याची संधी होती. मात्र ईशान शतक करण्यापासून 13 धावा दूर राहिला. मात्र ईशानने या खेळीसह टीमला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं आणि चाहत्यांची मनं जिंकली. ईशानला नॉटिंघमशर टीममध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कायले वेरेन याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

ईशान किशन याने त्याला मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेतला आणि यॉर्कशायर संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. ईशानने या खेळीत चौफेर फटके मारले. नॉटिंघमशरने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ईशान सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. ईशानने जॉर्ज हिल याच्या एकाच ओव्हरमध्ये 3 चौकार लगावले. ईशानने लियाम पॅटरसन-व्हाईटसह निर्णायक भागीदारी केली. त्यामुळे नॉटिंघमशरला 300 पार मजल मारता आली.

किशनची इंग्लंडमध्ये ‘ईशान’दार खेळी

ईशान किशनसाठी निर्णायक सामना

दरम्यान ईशानसाठी हे दोन्ही सामने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.ईशानचा या दोन्ही सामन्यात जास्तीत जास्त धावा करुन निवड समितीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असणार आहे, ज्यामुळे त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळू शकेल. ईशानने भारताचं 2 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.