AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याचे टीम इंडियातील परतीचे मार्ग बंद! इंग्लंडमध्ये दुखापत

Team India Cricketer Injured | आशिया कप 2023 स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याचे टीम इंडियातील परतीचे मार्ग बंद! इंग्लंडमध्ये दुखापत
| Updated on: Aug 16, 2023 | 9:04 PM
Share

लंडन | आशिया कप 2023 स्पर्धेची लगबग सुरु झाली आहे. 30 ऑग्सटपासून सुरुवात होणाऱ्या या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानने टीम जाहीर केली आहे. तर श्रीलंका, अफगाणिनस्तान आणि टीम इंडिया या तिन्ही संघांची घोषणा अजून व्हायची आहे. बीसीसीआय श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांच्या दुखापतीमुळे आशिया कपसाठी संघ जाहीर करण्यासाठी वेळ घेत आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

टीम इंडियापासून गेली अनेक महिने दूर असलेला पृथ्वी शॉ याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे टीम इंडियाला आशिया कपआधी मोठा झटका लागला आहे. पृथ्वी सध्या इंग्लंडमध्ये वनडे कप स्पर्धेत खेळत आहे. मात्र पृथ्वीला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

पृथ्वीला डरहम विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग दरम्यान गुडघ्याला दुखापत झाली. पृथ्वी या दुखापतीमुळे काउंटीमधून बाहेर झाला आहे. या सामन्यानंतर पृथ्वीने आवश्यक ते उपचार घेतले. तसेच टेस्टही केल्याया या टेस्टमधून जबर मार लागल्याचं समोर आलं.

पृथ्वी वनडे कपमध्ये नॉर्थ्मपटशायर टीमकडून काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पृथ्वीला पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली, मात्र पृथ्वी दुर्देवी ठरला आणि हिट विकेट झाला. पृथ्वीला पहिल्या सामन्यात 34 आणि दुसऱ्या सामन्यात 26 धावा केल्या. मात्र त्यानंतर पृथ्वीला सूर गवसला. पृथ्वीने पुढील 2 सामन्यात सलग द्विशतक आणि शतक ठोकत दहशत माजवली.

पृथ्वीने समरसेट विरुद्ध द्विशतकी खेळी केली. पृथ्वीने एकूण 244 धावा केल्या. तसेच त्यानंतर पृथ्वीने डरहम विरुद्धच्या सामन्यात 125 धावांची नाबाद खेळी साकारली. पृथ्वीने एकूण 4 सामन्यात 143 च्या सरासरीने 429 धावा केल्या. पृथ्वीने या खेळीसह आगामी आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपसाठी दावेदारी सिद्ध केली. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे पृथ्वीची टीम इंडियात कमबॅकची होती नव्हती ती शक्यता ही मावळली आहे.

पृथ्वीची आणखी एक कीर्तीमान

दरम्यान पृथ्वी शॉ याने वनडे कपमधील 4 सामन्यांमधील 400 पेक्षा अधिक धावांच्या मदतीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. पृथ्वीने लिस्ट ए क्रिकेट करियरमध्ये 3 हजार धावांचा पल्ला गाठला. पृथ्वीने 57 लिस्ट ए सामन्यांमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या.

त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.