AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, मोठी अपडेट समोर

टीम इंडिया आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी तयारी करताना दिसत आहे. त्याआधी आयपीएलसारखी मोठी स्पर्धा पार पडणार आहे. याच प्रदर्शनाच्या आधारावर वर्ल्ड कपसाठी खेळाडूंची निवड होणार आहे. मात्र त्याआधी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, मोठी अपडेट समोर
| Updated on: Dec 24, 2023 | 7:07 PM
Share

मुंबई : क्रिकेटमधील मोठी बातमी समोर आली आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप आणि आयपीएलआधी ही अपडेट समोर आल्याने सर्व क्रिकेटप्रेमी आनंदी झाले आहेत. टीम इंडिया आता साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असून त्यानंतर मायदेशात टीम इडियाची अफगाणिस्तानविरूद्ध टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. वर्ल्ड कप टीम इंडियासाठी टी-20 मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

नेमकी काय आहे अपडेट?

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत मोठी माहिती समजत आहे. हार्दिक पंड्या याची दुखापत बरी झाली असून तो अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत कमबॅक करणार आहे. (Hardik Pandya Health Update) इतकंच नाहीतर हार्दिक यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठीही फिट झाल्याची माहिती समजत आहे. हार्दिक पंड्या येत्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

हार्दिक पंड्या याला आयपीएलआधी मुंबईने इंडियन्सने ट्रेडिंग विन्डोमधून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. गुजरातचा कर्णधार सोडून आल्यावरच तोच मुंबईचा कर्णधार होणार असल्याच्या  चर्चांणा उधाण आलं होतं. अखेर काही दिवसांनी मुंबईने अधिकृतपणे तो कर्णधार असल्याचं जाहीर केलं. हार्दिकल कर्णधार केलं खरं पण रोहितला कर्धणारपदावरून हटवल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, हार्दिक पंड्या फिट झाल्याची माहिती समजल्याने 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरूद्ध सूरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी तोच कर्णधार असल्याचं जवळपास निश्चित आहे. हार्दिकच्या आधी सूर्यकुमार याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. आता सूर्यासुद्धा जखमी असल्याने हार्दिक नवीन वर्षात दमदार कमबॅक करणार असल्याचं दिसत आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.