AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL मॅचआधी सूर्यकुमार यादवचा मरिन ड्राईनवरील तरूणीसोबतचा Video तुफान व्हायरल!

Suryakumar Yadav at Marine Drive : भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याचा मरिन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. सूर्याने वेश बदलला असल्याचा पाहायला मिळत आहे.

IND vs SL मॅचआधी सूर्यकुमार यादवचा मरिन ड्राईनवरील तरूणीसोबतचा Video तुफान व्हायरल!
| Updated on: Nov 01, 2023 | 4:57 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा सातवा सामना श्रीलंकेसोबत उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबरला होणार आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय संघ ट्रायडंट हॉटेलमध्ये राहिला असून या हॉटेलच्या खाली मरिन ड्राईव्ह आहे. सामन्याच्या एकदिवसआधी स्काय म्हणजेच सूर्यकुमार यादव याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव मरिन ड्राईव्हवर गेलाय, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्याने वेश बदलला होता.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सूर्यकुमार यादव याने वेश बदलत स्वत:च्या फलंदाजीबद्दल तिथे असलेल्या लोकांना प्रश्न विचारले. वेश बदलताना सूर्याने टॅटू लपवण्यासाठी फुल शर्ट, मास्क, चष्मा आणि टोपी घातली होती. हॉटेलमधून बाहेर पडताना रविंद्र जडेजाही त्याला ओळखू शकला नाही. सूर्या कॅमेरामन बनला होता यावेळी त्याने भारतीय संघाबद्दल काही प्रश्न विचारले. तेव्हा एका चाहत्याने सूर्यकुमार याने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी असं सांगितलं.

तरूणी निघाली सूर्याची खास फॅन

सूर्यकुमार याने एका तरूणीला त्याच्या फलंदाजीबद्दल विचारल्यावर तिने, सूर्यीची बॅटींग पाहायला मजा येते. तो ३५० डिग्री खेळाडू असून पुढील सामन्यात त्याला संघाता जागा मिळेल अशी आशा करते, असं सांगितलं. शेवटी सूर्याला राहवलं नाही आणि त्याने आपल्या खास फॅनसमोर मास्क आणि कॅप काढली. सूर्याला पाहून तिला विश्वास बसत नव्हता, तिने एक सेल्फी घेतला त्यानंतर सूर्या तिथून गाडीत बसून निघून गेला.

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेमध्ये उद्या वानखेडे मैदानावर सामना होणार आहे. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव याचं स्थान पक्क मानलं जात आहे.  कारण आयपीएलमध्ये सूर्याचं वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड आहे.

सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.