Suryakumar Yadav : स्पिन खेळणं विसरले? सूर्यकुमार यादवला टाकली मेडन ओव्हर, काहीच नाही करता आलं

IND vs NZ 1st T20 : न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडिया स्पिन गोलंदाजी खेळणं विसरली आहे का? असा प्रश्न फॅन्स आणि दिग्गज विचारतायत.

Suryakumar Yadav : स्पिन खेळणं विसरले? सूर्यकुमार यादवला टाकली मेडन ओव्हर, काहीच नाही करता आलं
Suryakumar-yadavImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 1:15 PM

IND vs NZ 1st T20 : न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडिया स्पिन गोलंदाजी खेळणं विसरली आहे का? असा प्रश्न फॅन्स आणि दिग्गज विचारतायत. रांचीच्या पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाचा निम्मा संघ गारद केला. त्यामुळे हा प्रश्न विचारला जातोय. ऑफ स्पिनर मायकल ब्रेसवेल, कॅप्टन आणि लेफ्ट आर्म स्पिनर मिचेल सँटनर आणि लेग स्पिनर इश सोढीने मिळून टीम इंडियाच्या 5 विकेट काढल्या. या स्पिनर्ससमोर भारतीय फलंदाज हतबल दिसले.

त्याने जखडून ठेवलं

ब्रेसवेल आणि सँटनरने मिळून आपल्या कोट्यातील प्रत्येकी 4-4 ओव्हर टाकल्या. ब्रेसवेलने 31 आणि सँटनरने 11 धावा दिल्या. दोघांनी 2-2 विकेट काढल्या. इश शोढी थोडा महागडा ठरला. त्याने 3 ओव्हरमध्ये 30 रन्स देऊन एक विकेट काढला. सँटनरने आपल्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना अजिबात मोकळेपणे फलंदाजी करु दिली नाही. त्याने जखडून ठेवलं.

अर्शदीप सिंहला मेडन ओव्हर टाकली

सँटनरने T20 क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादवला अख्खी मेडन ओव्हर खेळवली. हार्दिक पंड्या आणि तो क्रीजवर असताना सँटनरे इतकी उत्कृष्ट बॉलिंग केली. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने अर्शदीप सिंहला मेडन ओव्हर टाकली. स्पिनर्सचा बोलबाला

मँचमध्ये सँटनरने शुभमन गिल आणि दीपक हुड्डाची विकेट काढली. ब्रेसवेलने इशान किशन आणि कॅप्टन हार्दिक पंड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इश सोढीने जबरदस्त बॅटिंग करणाऱ्या सूर्यकुमार यादवची विकेट काढली. या मॅचमध्ये भारताकडूनही स्पिनर्सच प्रभावी ठरले. वॉशिंग्टन सुंदरने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 2 विकेट काढल्या. कुलदीप यादवने 4 ओव्हरमध्ये 20 रन्स देऊन एक विकेट काढला.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.