AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करुण नायरबाबत अखेर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट काय ते सांगितलं, म्हणाला…

करुण नायरने या विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. 7 सामन्यांच्या अखेरीस 6 डाव खेळणाऱ्या करुण नायरने 5 शतके आणि 1 अर्धशतक झळकावून एकूण 752 धावा केल्या आहेत. तरीही त्याला संघातून डावललं आहे.

करुण नायरबाबत अखेर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट काय ते सांगितलं, म्हणाला...
| Updated on: Jan 18, 2025 | 4:37 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्डकप 2023 आणि या संघात चार बदल दिसून आले आले आहेत. दरम्यान, या संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्मात असलेल्या करूण नायरची निवड झाली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमीमध्ये चर्चा रंगली आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यानेही याबाबत आपलं मत मांडलं. ‘एखाद्या व्यक्तीचा सरासरी 700हून अधिक आहे, ती विशेष कामगिरी आहे. पण सध्या या संघात स्थान मिळणं कठीण आहे.’ अजित आगरकरने करूण नायरबाबत अशा भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे करूण नायरचं आठ वर्षानंतर टीम इंडियात परतण्याचं स्वप्नही भंगलं आहे. करुण नायर 2016 मध्ये भारतीय वनडे संघात खेळला होता. दोन सामन्यात त्याने 46 धावा केल्या होत्या. मात्र त्याला पुरेशी संधी काही टीम इंडियात मिळाली नाही. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण नायरने चांगली कामगिरी केली आहे. विजय हजारे वनडे स्पर्धेत करुण नायरने केलेली 752 धावसंख्या आहे.

करुण नायरने टीम इंडियासाठी ६ कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी त्याने 7 डावात फलंदाजी करत त्रिशतक झळकावले. मात्र या त्रिशतकानंतर तो अपयशी ठरल्याने त्याची त्यानंतर भारतीय संघात निवड झाली नाही. दोन वनडेत दिसलेल्या करुण नायरने 46 धावा केल्या. तसेच, 2017 मध्ये शेवटच्या वेळी टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या करुणने त्यानंतर कधीही टीम इंडियाचे दार काही उघडले नाही. करुण नायरने गेल्या वर्षभरापासून काउंटी क्रिकेट आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करून पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. विजय हजारे या स्पर्धेत सलग शतके झळकावून टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी आशा होती.  पण त्याला पुन्हा एकदा टीम इंडियाने हुलकावणी दिली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशवी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले