Team India Squad Announced: WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या खेळाडूला संधी

Team India squad for ICC World Test Championship 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. या टीममध्ये मागच्या वर्षभरापासून बाहेर असलेल्या एका खेळाडूला स्थान मिळालं आहे.

Team India Squad Announced: WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या खेळाडूला संधी
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 12:02 PM

WTC Final 2023 : बीसीसीआयच्या निवड समितीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीमची घोषणा केली आहे. या टीमच नेतृत्व रोहित शर्माच्या हाती आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणेला टीममध्ये संधी मिळालीय. विकेटकीपिंगची जबाबदारी केएस भरतवर आहे. 15 सदस्यीय टीममध्ये केएल राहुल आणि जयदेव उनाडकट आपल स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. या फायनलसाठी 12 जून रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

टीममध्ये किती फलंदाज? किती गोलंदाज?

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 15 सदस्यीय टीम निवडण्यात आली आहे. यात विकेटकीपर केएस भरतशिवाय 6 प्रमुख फलंदाज असतील. भारताच्या या टीममध्ये 5 वेगवान गोलंदाजांना संधी मिळालीय. 3 स्पिनर्स या टीममध्ये आहेत. दोन डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत.

WTC Final साठी कसं असेल टीम इंडियाच समीकरण?

टीम इंडियाची लिस्ट पाहून असं वाटतय, WTC फायनलमध्ये ओपनिंगची जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या खांद्यावर असेल. अजिंक्य रहाणेने टीममध्ये कमबॅक केलय. तो मधल्या फळीत खेळताना दिसेल. असं झाल्यास केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

वेगवान गोलंदाजीची धुरा कोणाकडे?

वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. स्पिनर्सच्या भूमिकेत अश्विन आणि जाडेजावर जबाबदारी असेल. WTC फायनलसाठी टींम इंडियात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. WTC Final साठी अशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

Non Stop LIVE Update
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.