AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : टीम इंडियाला मोठा झटका, या खेळाडूला दुखापत, पहिल्या सामन्याला मुकणार?

England vs India 1st Test Match : टीम इंडियाच्या गोटातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी दुखापत झाली आहे.

ENG vs IND : टीम इंडियाला मोठा झटका, या खेळाडूला दुखापत, पहिल्या सामन्याला मुकणार?
Yashasvi Shubman And Rishabh PantImage Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2025 | 11:22 AM
Share

टीम इंडिया एका नव्या आव्हानसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका ही मोठं आव्हान आहे. आर अश्विन, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या तिघांशिवाय टीम इंडिया पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडिया 6 जून रोजी इंग्लंडमध्ये पोहचली. तर रविवार 8 जूनपासून भारतीय संघाच्या सराव शिबिराला अर्थात नेट्स प्रॅक्टीसला सुरुवात झाली. या दरम्यान टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या स्टार आणि मॅचविनर खेळाडूला दुखापत झाली आहे.

ऋषभ पंतला दुखापत

टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला सरावादरम्यान दुखापत झाली. टीम इंडियाने रविवारपासून नेट्स प्रॅक्टीसला सुरुवात केली. पंतला या सरावादरम्यान दुखापत झाली. रेव्हस्पोर्ट्सनुसार, पंतला बॅटिंगदरम्यान दुखापत झाली.

पंतच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ सराव करताना बॉल लागला. पंतला बॉलचा फटका बसला. त्यामुळे पंत नेट्समधून बाहेर पडला. पंतला फटका बसल्याचं समजताच मेडीकल टीमने धाव घेतली. पंतला दुखापतीमुळे झालेल्या त्रास कमी व्हावा यासाठी मेडीकल टीमने त्याला ज्या ठिकाणी फटका बसला तिथे बर्फाने शेक दिला. पंतला ही दुखापत बॉलरसह बॅटिंगचा सराव करताना झाली की थ्रोडाऊन स्पेशालिस्ट सोबतच्या प्रॅक्टीस दरम्यान? हे अजूनही समजू शकलेलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतच्या हाताला पट्टी बांधण्यात आली. पंत त्यानंतर नेट्समधून बाजूला झाला. मात्र त्याने सहकाऱ्यांची साथ सोडली नाही. तसेच पंतला सरावादरम्यान संघर्ष करावा लागला. तसेच पंत 2-3 वेळा आऊटही झाला. तर पंत काही वेळा सरावादरम्यान अपयशीही ठरला.

पंतला झालेली दुखापत किती गंभीर?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना हा 20 जून रोजी हेडिंग्ले,लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. पंत या सामन्यापर्यंत फिट होणार का? पंतला झालेली दुखापत साधारण आहे की गंभीर? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

इंग्लंड विरूद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.