AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियात दुसऱ्या वनडेसाठी मोठा फेरबदल;एकामुळे काय होणार?

India vs England 2nd Odi : टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियात दुसऱ्या सामन्यासाठी एका खेळाडूमुळे काही बदल पाहायला मिळू शकतात.

IND vs ENG : टीम इंडियात दुसऱ्या वनडेसाठी मोठा फेरबदल;एकामुळे काय होणार?
rohit sharma and yashasvi jaiswal ind vs eng odiImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 09, 2025 | 9:21 AM
Share

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी 9 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. टीम इंडियात या दुसऱ्या सामन्यासाठी बहुतेक 1 बदल होऊ शकतो. मात्र त्या एका बदलामुळे टीम इंडियात मोठा परिणाम होऊ शकतो. टीम इंडियात नक्की काय बदल होऊ शकतो? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये दुसऱ्या सामन्यासाठी 1 बदल केला जाणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. नागपुरात झालेल्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे खेळता आलं नाही. विराटला गुडघ्याच्या दुखापतीमुळे मुकावं लागलं होतं. विराटच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर याचा समावेश करण्यात आला. तसेच यशस्वी जयस्वाल याला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र विराट दुसऱ्या सामन्यासाठी फिट असून तो कमबॅकसाठी सज्ज आहे, अशी माहिती टीम इंडियाच्या बॅटिंग कोच यांनी दिली आहे. त्यामुळे विराटच्या कमबॅकनंतर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल निश्चित आहे.

विराटच्या कमबॅकनंतर यशस्वी जयस्वाल याला बाहेर बसावं लागू शकतं. हा एक बदल झाला. तसेच यशस्वीला बाहेर केल्याने बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल होणार. कॅप्टन रोहितसोबत शुबमन गिल हा ओपनिंग करु शकतो. त्यामुळे विराटच्या कमबॅकनंतर असे 2 बदल अपेक्षित आहेत. आता हे असंच घडतं की काही वेगळं चित्र पाहायला मिळणार? हे टॉरसनंतरच स्पष्ट होईल.

इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, गुस ऍटकिन्सन, मार्क वुड, जेमी ओव्हरटन आणि जेमी स्मिथ.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.