Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं प्रारूप वेळापत्रक आलं समोर, पाहा टीम इंडियाचे सामने कधी आणि कुठे ते
सात महिन्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून जोरदार तयारी सुरु आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. दहशतवाद पाहता आता स्थिती सुधारणं कठीण आहे.

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानात होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून जोरदार तयारी सुरु आहे. कुठे काही कमी राहणार नाही यासाठी आतापासूनच काळजी घेतली जात आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यासाठी यावं यासाठी विनंती केली जात आहे. मात्र दहशतवाद पाहता भारताने आधीच पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. आशिया कप स्पर्धाही हायब्रीड मॉडेलवर खेळवली गेली होती. मात्र असं असूनही पाकिस्तानने या स्पर्धेचा प्रारुप आरखडा तयार केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून याचं वेळापत्रक आयसीसीकडे पाठवलं आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामने होणार आहेत. यात 12 साखळी फेरीचे सामने, दोन उपांत्य आणि एक अंतिम फेरीचा सामना आहे. या स्पर्धेतील उद्घाटनचा सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारीला होणार आहे. तर भारत बांग्लादेश सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण आठ संघ सहभागी होणार असून त्याची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात असल्याने आमनेसामने येणार हे निश्चित आहे. प्रारुप वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्चला सामना होणार आहे. स्पर्धेतील 11 वा सामना असून यावर उपांत्य फेरीचं गणित ठरू शकतं. त्यामुळे या सामन्याला एक वेगळंच महत्त्व असेल. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये हा हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळापत्रक
- 19 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (कराची)
- 20 फेब्रुवारी, भारत विरुद्ध बांग्लादेश (लाहोर)
- 21 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका (कराची)
- 22 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (लाहोर)
- 23 फेब्रुवारी, न्यूझीलंड विरुद्ध भारत (लाहोर)
- 24 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (रावळपिंडी)
- 25 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (लाहोर)
- 26 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका (रावळपिंडी)
- 27 फेब्रुवारी, बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड (लाहोर)
- 28 फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (रावळपिंडी)
- 1 मार्च, भारत विरुद्ध पाकिस्तान (लाहोर)
- 2 मार्च, दक्षिण अफ्रिका विरुद्ध इंग्लंड (रावळपिंडी)
- 5 मार्च, उपांत्य फेरी 1 (कराची)
- 6 मार्च, उपांत्य फेरी 2 (रावळपिंडी)
- 9 मार्च, अंतिम फेरी (लाहोर)
