
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाने प्रथम फलंदाजी घेतली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 159 धावांवर बाद झाला. खरं तर 57 धावांपर्यंत दक्षिण अफ्रिकेची एकही विकेट पडली नव्हती. पण त्यानंतर 102 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. एकीकडे दक्षिण अफ्रिकेची घसरगुंडी सुरु असताना दुसरीकडे ऋषभ पंतचं वक्तव्य चर्चेत आहे. ऋषभ पंत आपल्या बिंधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. त्याच्या बोलण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना असाच एक वक्तव्य त्याने केलं. त्याचं हे वक्तव्य स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं असून वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना ऋषभ पंत म्हणाला की, सगळे असचं करणार आहे. ते सर्व जण मागून चेंडू खेळतात. क्षेत्ररक्षकांना आत ठेवता येते. संपूर्ण संघ असाच खेळतो. त्यानंतर रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. तेव्हा अफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमा फलंदाजी करत होता. तेव्हा पंतने जडेजाला सांगितलं की, जड्डू भाई इथे थोडासा ठेव. जर त्याने स्वीप मारला तर तो झेलबाद होईल. सिंगलसाठी नको, हा स्वीपवाला आहे. झेलसाठी ठेव. यानंतर बावुमा कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ध्रुव जुरेलच्या हातात झेल देऊन बाद झाला.
Rishabh Pant is back in Tests and so is the comedy, and clutch advice that only he can deliver! 😄🔥
From firing up bowlers to mic-drop one-liners on the stump mic, the man is already serving Rishabh Panti. 🎙️💙#INDvSA 1st Test LIVE NOW 👉 https://t.co/uK1oWLgsfx pic.twitter.com/spqaupMr3T
— Star Sports (@StarSportsIndia) November 14, 2025
दक्षिण अफ्रिका संघाकडून एडन मार्करमने सर्वाधिक 31 आणि रियान रिकल्टने 23 धावा केल्या. याशिवाय कोणीही चांगली फलंदाजी करू शकलं नाही. कसोटीच त्रिशतक ठोकणारा वियान मुल्डरही 24 धावांवर बाद झाला. तर मार्को यानसेन आणि केशव महाराज विना खातं खोलता तंबूत परतले. खरं तर दक्षिण अफ्रिकेचा निम्मा संघ एकट्या जसप्रीत बुमराहने तंबूत पाठवला. त्याने 5 विकेट काढल्या. तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट काढल्या. तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.