AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार रोहित शर्माचा वनडे क्रिकेटचा अंतिम सामना! क्रिकेटला ठोकणार रामराम?

कर्णधार रोहित शर्मा याने टी20 क्रिकेटला वर्ल्डकपनंतर रामराम ठोकला होता. त्यामुळे आता वनडे क्रिकेट कारकिर्दिचा शेवट झाल्याचं बोललं जात आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यानंतर रोहित शर्माच्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. विजयानंतर रोहित शर्मा आता निवृत्ती घेईल अशी चर्चा आहे.

कर्णधार रोहित शर्माचा वनडे क्रिकेटचा अंतिम सामना! क्रिकेटला ठोकणार रामराम?
Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 04, 2025 | 11:17 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा ही रोहित शर्माच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. साखळी फेरीत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत मजल मारली. तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने  4 गडी आणि 11 चेंडू राखून गाठला. या सामन्यात रोहित शर्माने 28 धावांची खेळी केली. रोहित शर्माकडून अंतिम फेरीत चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. रोहित शर्मा आता 38 वर्षांचा आहे. टी20 फॉर्मेटमधून त्याने वर्ल्डकप विजयानंतर निवृत्त झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीची शेवटची स्पर्धा असेल अशी चर्चा आहे. रोहित शर्माने याबाबत काही स्पष्ट केलं नाही. पण बीसीसीआय रोहित शर्माला पुढे संधी देईल की नाही याबाबत शंका आहे. कारण यानंतर वनडे फॉर्मेटमध्ये 2027 मध्ये वर्ल्डकप होणार आहे. यासाठी नव्याने टीम बांधण्याचं बीसीसीआयसमोर आव्हान आहे. त्यामुळे रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणं कठीण आहे.

रोहित शर्मा त्याचा वनडे क्रिकेट कारकिर्दितील शेवटचा सामना खेळेल असंच म्हणावं लागेल. अंतिम सामन्यात न्यूझीलंड किंवा दक्षिण अफ्रिकेशी लढत होणार आहे. त्यानंतर पुढे दोन महिने आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जाणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्माकडे कर्णधारपद असण्याची शक्यता खूपच कमी आहे. कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे जाईल अशीही क्रीडावर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, वनडे क्रिकेटचं यानंतर कोणतंच शेड्युल दिसत नाही. त्यामुळे रोहित शर्मा त्याच्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना खेळला असं बोललं जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने वनडे क्रिकेटमध्ये दोन आशिया कप जिंकले आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 विजयाच्या वेशीवर संघ होता. पण अंतिम फेरीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीपर्यंत रोहित शर्माने 55 सामन्यात नेतृत्व केलं आहे. यात 41 सामन्यात विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 74.07 इतकी आहे.

Follow Us
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?