Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीकडून ऑस्ट्रेलियाला झुकतं माप! सिडनीत कसोटीत असा प्रकार घडूनही दिली क्लीन चीट

ब़ॉर्डर गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचं मूल्यांकन केलं आहे. पाच कसोटी सामने खेळलेल्या खेळपट्ट्यांना रेटिंग जारी केलं आहे. इतकंच काय तर सिडनी कसोटी खेळलेल्या मैदानाला दिलेली रेटिंग पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण या खेळपट्टीबाबत ग्लेन मॅक्ग्रा आणि सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आयसीसीकडून ऑस्ट्रेलियाला झुकतं माप! सिडनीत कसोटीत असा प्रकार घडूनही दिली क्लीन चीट
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 8:12 PM

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला 3-1 पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 गडी राखून विजय मिळवला. आता आयसीसीने कसोटी मालिकेतील पाच खेळपट्ट्यांचं मूल्यांकन केलं आहे. पर्थ, ॲडलेड, ब्रिस्बेन आणि मेलबर्न येथील खेळपट्ट्यांना असे रेटिंग देण्यात आले. पण शेवटच्या कसोटीचे यजमानपद देणाऱ्या सिडनीच्या खेळपट्टीला आयसीसीने ‘समाधानकारक’ मानांकन दिले आहे. सिडनी कसोटी खेळपट्टी समाधानकारक असल्याचं सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण या सामन्यात पहिल्या दिवशी 11 विकेट पडल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी 15 विकेट पडल्या. त्यामुळे माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅक्ग्रा आणि सुनील गावस्कर यांनी खेळपट्टीबाबत आश्चर्य व्यक्त केलं होतं. इतकंच काय तर समालोचन करताना खराब खेळपट्टी असाही शेरा मारला होता.

सिडनीची खेळपट्टी साधरणत: फलंदाजीसाठी पूरक आहे. पण या खेळपट्टीवर धावा होण्याऐवजी फलंदाजांना संघर्ष करावा लागला. त्यामुळे हा कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसातच संपला. सिडनीच्या खेळपट्टीवर भरपूर गवत होतं. तसेच चेंडू बऱ्यापैकी स्विंग होत होता. यावर ग्लेन मॅक्ग्राने मत व्यक्त करत सांगितलं होतं की, ‘सिडनीत अशी खेळपट्टी यापूर्वी पाहिली नव्हती.’ तर सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितलं होतं की, ‘एका दिवसात 15 विकेट पडलेल्या पाहून ही खेळपट्टी कसोटीसाठी तयार नव्हती असं दिसतंय. गाय सोडल्यास पिचवरील गवत खाईल अशी स्थिती आहे.’

भारत ऑस्ट्रेलिया पाचव्या कसोटीचा अवघ्या 1141 चेंडूत निकाल लागला. याआधी 1931 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना 1184 चेंडूत संपला होता. 1985 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना 911 चेंडूत संपला होता. तसेच 1888 मध्ये या दोन संघांमधील सामन्याचा निकाल फक्त 1129 चेंडूत लागला होता. यावरून खेळपट्टी किती खराब असू शकते याची कल्पना येते. असे असतानाही आयसीसीने ही खेळपट्टी ‘समाधानकारक’ श्रेणीत ठेवली आहे.

2023 मध्ये आयसीसीने आपल्या रेटिंग सिस्टममध्ये काही बदल केले आहेत. पूर्वी सहा टप्प्यात रेटिंग होती. मात्र आता चार टप्प्यात खेळपट्टीचा दर्जा ठरवला जातो. यात ‘खूप चांगली’, ‘समाधानकारक’, ‘असमाधानकारक’ आणि ‘खेळण्यासाठी अयोग्य’ असे चार प्रकार आहेत.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.