AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत सोडून रॉबिन उथप्पा दुबईत झाला स्थायिक, या समस्येचं कारण केलं पुढे

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रॉबिन उथप्पा भारत सोडून दुबईत स्थायिक झाला आहे. वर्ल्डकप विजेत्या संघात असलेल्या खेळाडूने असा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेमकं असं का आणि कशासाठी असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहे. अखेर त्याने स्वत: यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

भारत सोडून रॉबिन उथप्पा दुबईत झाला स्थायिक, या समस्येचं कारण केलं पुढे
Image Credit source: (फोटो-GETTY IMAGES)
| Updated on: Nov 29, 2024 | 1:28 PM
Share

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून दोन वर्षे झाली आहेत. रॉबिन उथप्पाने 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच टीम इंडियासाठी 2015 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. आयपीएलमध्ये काही वर्षे खेळल्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता रॉबिन उथप्पा क्रिकेट सामन्यात समालोचकाची भूमिका बजावत आहे. पण सध्या रॉबिन उथप्पा भारताऐवजी दुबईत राहात आहे. पॉडकास्टमध्ये उथप्पाने भारत सोडण्याचं कारण सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.रॉबिन उथप्पा गेल्या एका वर्षापासून दुबईत आपल्या कुटुंबासह कायमस्वरुपी वास्तव्यास गेला आहे. पण उथप्पाला पूर्णपणे भारताशी नाळ तोडता आली नाही. कारण उथप्पा देशात होणाऱ्या विविध लीगमध्ये भाग घेतो. तसेच स्पोर्ट्स चॅनेल्सवर समालोचकाची भूमिकाही बजावतो. आता एका पॉडकास्टमध्ये उथप्पाने भारत सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

रॉबिन उथप्पाने सांगितलं की, ‘आपल्या मुलांना इथल्या ट्राफीकमध्ये त्रास होऊ नये म्हणून बंगळुरूहून दुबईला स्थायिक झाला आहे. मी माझं आवडतं बंगळुरू शहर सोडलं कारण माझ्या मुलांना अशा ठिकाणी ठेवणं योग्य नव्हतं. कारण येथे अर्ध आयुष्य ट्राफीकमध्ये जातं.’ रॉबिन उथप्पाने पुढे नमूद केलं की, नुकताच तो आणि त्याचं कुटुंब बंगळुरुमध्ये साडेचार तास ट्राफीकमध्ये अडकले होते.

रॉबिन उथप्पाने मुलीच्या आजारावेळी नेमकं काय घडलं तो प्रसंगही सांगितला. मुलीची तब्येत बिघडली होती तेव्हा तिला घरापासून 3.5 किमी अंतरावर नेण्यासाठी पुरती कसरत करावी लागली. या प्रवासासाठी 45 मिनिटांचा अवधी लागला. तर तिथून घरी येण्यासाठी साडे चार तास लागले. हा प्रवास लक्षात घेऊनच मी माझ्या मुलीसाठी दूध आणि जेवण गाडीत ठेवलं होतं. ट्राफीच्या या समस्येला त्रासल्यानेच देश सोडण्याचा निर्णय घेतला.

रॉबिन उथप्पा भारतासाठी 46 वनडे, 13 टी20 सामने खेळला आहे. वनडेत 934 धावा केल्या असून यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी20 249 धावा केल्या असून 1 अर्धशतक नावावर आहे. आयपीएलचे 205 सामने खेळला असून 4952 धावा केल्या आहेत आणि 27 अर्धशतकं ठोकली आहेत.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.