AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : फरक नाही पडत…, वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर प्रतिक्रिया, असं का म्हणाला?

Vaibhav Suryavanshi Post Match Presentation : वैभवने यूएईच्या गोलंदाजांची बॅटने जोरदार धुलाई करत 171 धावांची खेळी साकारली. वैभव गोलंदाजांकडून आऊट होत नाही म्हटल्यावर यूएईच्या विकेटकीपरने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. वैभवने याबाबत सामन्यानंतर काय म्हटलं? जाणून घ्या.

Vaibhav Suryavanshi : फरक नाही पडत...,  वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर प्रतिक्रिया, असं का म्हणाला?
Vaibhav Suryavanshi Indian Cricket TeamImage Credit source: PTI
| Updated on: Dec 12, 2025 | 9:20 PM
Share

अंडर 19 टीम इंडियाचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आशिया कप 2025 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वादळी खेळी केली. वैभवने 171 धावा केल्या. वैभवच्या या खेळीमुळे टीम इंडियाला यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती संघाविरुद्ध 234 धावांनी धमाकेदार विजय मिळवता आला. टीम इंडियाने यूएईसमोर 434 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यूएईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 199 धावांपर्यंत पोहचता आलं. वैभवला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. वैभवने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये प्रेझेंटेटरसह संवाद साधला. कायम बॅटिंगने गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या वैभवने या दरम्यान आपल्या शब्दांनी चाहत्यांची मनं जिंकली. वैभवने स्लेजिंगवरुनही प्रतिक्रिया दिली.

वैभव नक्की काय म्हणाला?

वैभवने आयपीएल 2025 नंतर अंडर 19 टीम इंडिया, यूथ टेस्ट, यूथ वनडे, टी 20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. वैभवने अंडर 19 वनडे आशिया कप 2025 स्पर्धेत हाच तडाखा कायम ठेवत शतक झळकावलं. वैभवने 95 बॉलमध्ये 180 च्या स्ट्राईक रेटने 171 रन्स केल्या. वैभवने या खेळीत 14 षटकार आणि 9 चौकार लगावले. वैभव अंडर 19 क्रिकेटमध्ये दीडशतक करणारा सातवा भारतीय फलंदाज ठरला. तसेच वैभव यूथ वनडेतील एका सामन्यात 10 षटकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला.

वैभवला बॅटिंग दरम्यान यूएईच्या खेळाडूने डिवचून त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. वैभवने यावरुन सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली. वैभवने स्लेजिंगमुळे फरक पडत नाही, असं म्हटलं.

वैभव काय म्हणाला?

वैभवने 56 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. वैभवने त्यानंतर 28 चेंडूत दीडशतक पूर्ण केलं. वैभवला द्विशतक करण्याची संधी होती. मात्र वैभवला त्यात यश आलं नाही. वैभव 171 धावांवर आऊट झाला. वैभवला बॅटिंग दरम्यान यूएईच्या विकेटकीपरने काही तरी म्हटलं. वैभवला यावरुनच प्रश्न करण्यात आला. वैभव बॅटिंग करत असताना त्याचं लक्ष भरकटवण्यासाठी यूएईचा विकेटकीपर एकसारखंच काही तरी बडबडत होता. मात्र वैभववर याचा काहीही फरक पडला नाही.

“सर मी बिहारवरुन येतो. त्यामुळे मागून कोण काय बोलतोय याने मला काही फरक पडत नाही. विकेटकीपरचं कामच आहे बोलत राहणं. तर माझं लक्ष बॅटिंगवर होतं”, असं म्हणत वैभवने यूएईच्या विकेटकीपरने डिवचण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.