
आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कपनंतर आणि मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी आता अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अंडर 19 वनडे वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ भिडणार आहेत. या 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा 15 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. तर 6 फेब्रुवारीला अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. अशाप्रकारे या स्पर्धेत 41 एकदिवसीय सामन्यांनंतर वर्ल्ड कप जिंकणारा संघ कोणता असणार? हे स्पष्ट होईल. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी अर्थात 15 जानेवारीला पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध यूएसए आमनेसामने असणार आहेत. हा सामना कुठे आणि कधी पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
भारताने अंडर 19 वर्ल्ड कपआधी शेवटच्या यूथ वनडे सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. भारताने वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत वैभवने शानदार पद्धतीने नेतृत्व केलं. मात्र आता नियमित कर्णधार आयुष म्हात्रे दुखापतीवर मात करुन वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. तर उत्कर्ष श्रीवास्तव हा यूएसएच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
भारत विरुद्ध यूएसए सामना गुरुवारी 15 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध यूएसए सामना क्विन्स स्पोर्ट्स कल्ब, बुलावायो इथे आयोजित करण्यात आला आहे.
भारत विरुद्ध यूएसए सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
भारत विरुद्ध यूएसए सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहता येईल.
भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरीश, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), उधव मोहन, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन आणि खिलान पटेल.
दरम्यान टीम इंडियाचा या स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए ग्रुपमध्ये भारत, यूएसए व्यतिरिक्त बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत आपल्या ग्रुपमधील प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध 1 असे एकूण 3 सामने खेळायचे आहेत.