U19 IND vs SA: टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, वैभव सूर्यवंशीकडे नेतृत्व, सामना किती वाजता सुरु होणार?

U19 India vs South Africa 1st One Day Live Streaming : अंडर 19 टीम इंडिया 2026 मधील आपल्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला शनिवार 3 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

U19 IND vs SA: टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, वैभव सूर्यवंशीकडे नेतृत्व, सामना किती वाजता सुरु होणार?
U19 Team India Vaibhav Suryavanshi
Image Credit source: Michael Steele/Getty Images
| Updated on: Jan 02, 2026 | 11:27 PM

सिनिअर टीम इंडिया नववर्षातील आपला पहिला सामना हा 11 जानेवारीला खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. आयुष म्हात्रे हा अंडर 19 टीम इंडियाचा कर्णधार आहे. मात्र आयुषला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. अशात आता आयुषच्या अनुपस्थितीत वैभव सूर्यवंशी भारताचं नेतृत्व करणार आहे. तर मुहम्मद बुलबुलिया याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची सूत्र आहेत. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कधी?

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचं आयोजन हे शनिवारी 3 जानेवारीला करण्यात आलं आहे.

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे?

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना हा विलोमूर पार्क, बेनोनी इथे खेळवण्यात येणार आहे.

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर दाखवण्यात येणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. मात्र हा सामना चाहते हॉटस्टार एपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह पाहू शकतात.

शनिवारी पहिला एकदिवसीय सामना

वैभवच्या कामगिरीकडे लक्ष

वैभव सूर्यवंशी याने गेल्या काही महिन्यांत सातत्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. वैभवने त्याच्या बॅटिंगने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र आता वैभव शनिवारपासून नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. वैभव पहिल्याच सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. वैभवची नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे वैभव फलंदाजीसह कर्णधार म्हणून दुहेरी भूमिका कशी पार पाडतो? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.