AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup : मुशीर खानचा हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का? चेंडू असा पाठवला सीमेपार Watch Video

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकल्यानंतर सुपर सिक्समध्येही जलवा पाहायला मिळाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मुशीर खानची बॅट चांगलीच तळपली. स्पर्धेत सलग दुसरं शतक झळकावत विजयात मोलाचा हातभार लावला.

U19 World Cup : मुशीर खानचा हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का? चेंडू असा पाठवला सीमेपार Watch Video
U19 World Cup : मुशीर खानच्या हेलिकॉप्टर शॉटने मारला सिक्स, सोशल मीडियावर रंगली चर्चा
| Updated on: Jan 31, 2024 | 5:44 PM
Share

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे. या स्पर्धेत सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीर खान चांगली कामगिरी करत आहे.स्पर्धेत सलग दुसरं शतक झळकावत छाप पाडली आहे. सुपर सिक्स फेरीत भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने आले होते. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारताने 50 षटकात 8 गडी गमवून 295 धावा केल्या. या धावसंख्येत मोलाची भर घातली ती मुशीर खानने. मुशीर खानने 126 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 131 धावा केल्या. या खेळीत मुशीर खानच्या हेलिकॉप्टर शॉटची चर्चा रंगली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या शैलीत त्याने उत्तुंग षटकार ठोकला. सामन्याच्या 45 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर डीप मिड विकेटवरून मारलेला षटकार पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. क्लार्कच्या वेगवान चेंडूला त्याने हेलिकॉप्टर शॉटने दिशा दिली आणि षटकार मारला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुशीर खानचं शतक झालं होतं आणि 114 धावांवर खेळत होता. न्यूझीलंडच्या कर्णधाराने क्लार्कच्या हाती चेंडू सोपवला होता. तेव्हा त्याच्या पहिल्याच चेंडूवर हेलिकॉप्टर शॉटने षटकार मारला. तसेच 120 धावा पूर्ण केल्या. त्याच्या या शॉटमध्ये महेंद्रसिंह धोनीची छबी दिसत होती. दुसरीकडे, मुशीर खानने गोलंदाजीतही कमाल केली. दोन गडी बाद करत न्यूझीलंडला पराभवाच्या दरीत ढकललं. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर मुशीर खान म्हणाला की, “सलग दोन शतकं ठोकल्यानंतर नक्कीच आनंद झाला आहे. त्यामुळे पुढेही अशीच खेळी करण्याचा मानस आहे. या शतकामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): जेम्स नेल्सन, टॉम जोन्स, स्नेहिथ रेड्डी, लचलान स्टॅकपोल, ऑस्कर जॅक्सन (कर्णधार), ऑलिव्हर टेवाटिया, झॅक कमिंग, एलेक्स थॉम्पसन (विकेटकीप), इवाल्ड श्र्युडर, रायन त्सोर्गस, मेसन क्लार्क

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारण (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.