Ravi Shastri on Umran Malik : उमरान मलिकला टी-20 विश्वचषका संधी मिळणार नाही, रवी शास्त्री असं का म्हणालेत? जाणून घ्या…

उमराननं अलीकडेच आयपीएल 2022 मध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीनं चाहत्यांची मनं जिंकली. त्यानं 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या.

Ravi Shastri on Umran Malik : उमरान मलिकला टी-20 विश्वचषका संधी मिळणार नाही, रवी शास्त्री असं का म्हणालेत? जाणून घ्या...
रवी शास्त्री यांचं मोठं विधानImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 1:42 PM

मुंबई :  आयपीएलमध्ये (IPL 2022) आपल्या कामगिरीची झलक दाखवणारा खेळाडू आणि युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याच्यासंदर्भात दिग्गज क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक मोठा दावा केला आहे. यामुळे क्रीडा विश्वात मोठी चर्चा रंगली आहे. रवी शास्त्र हे नेहमी नवख्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना दिसतात. ते अनेकदा खेळाडूंविषयी पुढील भाकीतही वर्तवताना दिसतात. अशातच त्यांनी उमरान मलिक याच्याविषयी असाच एक दावा केला आहे.  उमरान त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे अलीकडच्या काळात चर्चेत आहे. उमरानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, नवी दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. याचठिकाणी टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. उमराननं आपल्या वेगानं अनेक दिग्गजांना वेड लावलंय. आता या दिग्गजांना असं वाटतंय की जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाजाला आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळावी. मात्र, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उमरानविषयी थोडं वेगळं भाकीत केलं आहे. उमरानला टी-20 विश्वचषक 2022 च्या संघात निवडणं खूप घाईचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

रवी शास्त्री नेमकं काय म्हणालेत?

रवी शास्त्री यांनी ESPNcricinfo सोबत बोलताना म्हटलंय की, ‘ उमरानला नाहीच, अजून T20 वर्ल्ड कपमध्ये नाही. आता उमरानची तयारी करा. त्याला संघासोबत नक्की घेऊन जा. शक्य असल्यास उमरानला 50 षटकांचे क्रिकेट किंवा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी द्या. त्याला कसोटी संघ तयार करा आणि मग तो कसा जुळवून घेतो ते पहा,’ शास्त्री म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

त्याचवेळी न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी म्हणाला, ‘मला वाटतं की तो संघात नसला तरीही त्याने नेहमीच भारतीय संघासोबत असलं पाहिजे. मला वाटते की त्याची वेळ येईल. अलीकडेच उमरान आयपीएलमध्ये विशेष कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीनं त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, रवी शास्त्री यांच्यामते फार घाई नको, असं दिसतंय.

 वेगवान गोलंदाजीनं चर्चेत

उमराननं अलीकडेच आयपीएल 2022 मध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीनं चाहत्यांची मनं जिंकली. त्यानं 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या. त्याची वेगवान गोलंदाजी पाहून क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी त्याचं कौतुक केलं आहे. आयपीएल 2022 मध्ये उमराननं 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. यानंतर त्याची तुलना शोएब अख्तरशी करण्यात आली.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.