AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड चॅम्पियनशिपदरम्यान अचानक पूलमध्ये बेशुद्ध झाली स्विमर; देवदूताप्रमाणे धावून आला कोच अन्..

world aquatic championship: बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या वर्ल्ड एक्वाटिक्स चॅम्पियनशिप (World Aquatics Championship) स्पर्धेत एक मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने एका महिला जलतरणपटूचे प्राण वाचले.

वर्ल्ड चॅम्पियनशिपदरम्यान अचानक पूलमध्ये बेशुद्ध झाली स्विमर; देवदूताप्रमाणे धावून आला कोच अन्..
anita alwarez
| Updated on: Jun 24, 2022 | 1:25 PM
Share

मुंबई: बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या वर्ल्ड एक्वाटिक्स चॅम्पियनशिप (World Aquatics Championship) स्पर्धेत एक मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने एका महिला जलतरणपटूचे प्राण वाचले. अमेरिकेची स्विमर अनिता अल्वारेज (Anita Alvarez) बुधवारी नेहमीप्रमाणे आपले रुटीन फॉलो करत होती. पूलमध्ये ती स्विमींग करत होती. या दरम्यान अचानक ती बेशुद्ध झाली व पूलमध्ये बुडू लागली. सोलो फ्री फायनल दरम्यान हा अपघात घडला. अनिता कुठलीही हालचाल करत नाहीय, ती निपचित पडलीय हे लक्षात येताच तिच्या कोच अँड्रिया फुएन्टेस (Andrea fuentes) यांनी पूलमध्ये लगेच उडी मारली व तिचे प्राण वाचवले. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वचजण बिथरले. काही वेळासाठी स्पर्धास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनिता सुखरुप असल्याचं समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

लगेच पूल मध्ये उडी मारली

अनिता पूलमध्ये असताना, तिला व्यवस्थित श्वास घेता येत नव्हता. ही बाब तिच्या कोच अँड्रिया फुएन्टेस यांच्या लक्षात आली. आंद्रेने अनिताची स्थिती पाहून, लगेच पूल मध्ये उडी मारली व तिला बाहेर काढलं. आंद्रेने तिला पाण्यातून बाहेर काढलं.

जलतरण टीमकडून स्टेटमेंट प्रसिद्ध

त्यानंतर अनिताला स्ट्रेचवरुन पूलच्या मेडीकल सेंटरमध्ये नेण्यात आलं. तिची स्थिती पाहून सहकारी आणि प्रेक्षक टेन्शनमध्ये होते. अमेरिकेच्या जलतरण टीमने स्टेटमेंट प्रसिद्ध करुन तिची स्थिती चांगली असल्याची माहिती दिली.

स्वीमिंग करताना बेशुद्ध कशी झाली?

अनिताच्या रुटीनमध्ये वाढ करण्यात आली, त्यामुळे ती बेशुद्ध झाली, असं तिच्या कोच अँड्रिया फुएन्टेस यांनी स्पॅनिश रेडिओशी बोलताना सांगितलं. “मी लाइफ गार्ड्सला पाण्यात उतरायला सांगत होती. पण मी जे सांगत होती. ते त्यांना कळत नव्हतं, किंवा त्यांना ऐकू येत नव्हतं. तिला श्वास घेता येत नव्हता. ऑलिम्पिक फायनल असल्याप्रमाणे मला जितक्या वेगात शक्य होतं, तितक्या वेगात मी हे सर्व केलं” असं फुएन्टेस म्हणाल्या. तिचं ह्दय सुरु आहे का ? हे मी आधी तपासलं, ते सुरु होतं. नंतर तिला मी श्वासोश्वास घेण्यासाठी मदत केली, असं अँड्रिया फुएन्टेस  म्हणाल्या. मागच्यावर्षी ऑलिंपिक पात्रता फेरीच्यावेळी सुद्धा ती अशीच बेशुद्ध झाली होती. आर्टिस्टिक स्विमींगमध्ये असं घडतं, नेहमीच असं होत नाही. पण काही वेळा अशा घटना घडतात, असं खेळाशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांनी सांगितलं.

आर्टिस्टिक स्विमींग काय आहे?

आर्टिस्टिक स्विमींग हा कलात्मक स्वीमिंगचा एक प्रकार आहे. यात जलतरणपटू संगीताच्या तालावर पूलमध्ये कलात्मक सादरीकरण करतात. हा महिलांचा क्रीडा प्रकार समजला जातो. आर्टिस्टिक स्विमींग हा कॅनडामध्ये विकसित झालेला क्रीडा प्रकार आहे. आर्टिस्टिक स्विमींगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे.

अनिता अल्वारेज कोण आहे ?

2 डिसेंबर 1996 रोजी अनिताचा जन्म झाला. ती 26 वर्षांची आहे. ती मेक्सिकन अमेरिकन आर्टिस्टिक स्विमर आहे. न्यूयॉर्कमध्ये रहाणाऱ्या अनिताने केनमोर वेस्ट सीनियर हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं. 2014 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिने प्रोफेशन स्वीमिंगची सुरुवात केली. ती अमेरिकेच्या सिंक्रोनाइज्य टीममध्ये होती. 2014 ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2015 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती सहभागी झाली होती.

2019 मध्ये मिळाली ओळख

अनिता मारिया कोरोलेवा या जोडीदारासह रियो ऑलिंपिक 2016 मध्ये सहभागी झाली होती. 2019 मध्ये तिने महिला दुहेरी आणि महिला टीमकडून लीमा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक जिंकलं. त्याचवर्षी तिला यूएसए सिंच्रो एथलीट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं