Ind vs Aus 1st Test : Usman Khawaj OUT होताच ऑस्ट्रेलियात रडीचा डाव सुरु, सर्व मर्यादा ओलांडल्या

Ind vs Aus 1st Test : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने त्यांच्या ओपनिंग जोडीला खेळपट्टीवर पाय रोवू दिले नाहीत. ऑस्ट्रेलियाची ओपनिंग जोडी फक्त 13 चेंडूसाठी विकेटवर टिकली.

Ind vs Aus 1st Test : Usman Khawaj OUT होताच ऑस्ट्रेलियात रडीचा डाव सुरु, सर्व मर्यादा ओलांडल्या
usman khawajaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 12:06 PM

Ind vs Aus 1st Test : नागपूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने त्यांच्या ओपनिंग जोडीला खेळपट्टीवर पाय रोवू दिले नाहीत. ऑस्ट्रेलियाची ओपनिंग जोडी फक्त 13 चेंडूसाठी विकेटवर टिकली. आधी उस्मान ख्वाजा 1 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर डेविड वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला. उस्मान ख्वाजाच्या विकेटवर ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं, तेव्हा हद्द झाली.

बॉल ट्रॅकरवर प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियातील मोठं चॅनल फॉक्स क्रिकेटने उस्मान ख्वाजाच्या विकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. उस्मान ख्वाजा LBW आऊट झाला. अंपायनरे आधी त्याला नॉट आऊट दिलं होतं. त्यावेळी टीम इंडियाने DRS ची मदत घेतली. त्यावेळी ख्वाजा बाद झाला. त्यानंतर फॉक्स क्रिकेटने उस्मान ख्वाजाचा एक फोटो पोस्ट केला. त्यात बॉल ट्रॅकर सिस्टिमवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलय.

बॉल ट्रॅकरवर प्रश्नचिन्ह

बॉल ट्रॅकर तुटलय, असं फॉक्स क्रिकेटच्या टि्वटर हँडलवरुन टि्वट करण्यात आलय. उस्मान ख्वाजा ज्या चेंडूवर आऊट झाला, तो लेग स्टम्पच्या बाहेर पीच झाला होता, असं फॉक्स क्रिकेटच म्हणणं आहे. पण चेंडू स्टम्पच्या लाइनमध्ये असल्याच फोटोमध्ये दिसतय.

भिती स्पिनर्सची होती, पण….

ऑस्ट्रेलियन टीमला स्पिन गोलंदाजीची भिती सतावतेय. पण त्यांच्या ओपनर्सनी वेगवान गोलंदाजांसमोर सरेंडर केलं. उस्मान ख्वाजानंतर डेविड वॉर्नर मोहम्मद शमीच्या वर्ल्ड क्लास बॉलवर आऊट झाला. शमीचा चेंडू पीचवर पडल्यानंतर वेगाने आत आला. वॉर्नर बाद झाला, तो स्टम्प लांबलचक उडाला.

टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला

नागपूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. त्यांनी पहिली बॅटिंग घेतली. भारतीय टीमकडून सूर्यकुमार यादव आणि श्रीकर भरतने आज डेब्यु केला. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने डेब्यु केला. भारताची प्लेइंग इलेवन- रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.