Vaibhav Sooryavanshi: एका फोटोचे 100 रूपये! वैभव सूर्यवंशीने चाहत्यांकडे थेट केली मागणी, Video Viral

Vaibhav Sooryavanshi Viral Video: आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशी फॉर्मात आहे. त्याच्या फलंदाजीमुळे त्याचा चाहत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. पण त्याच्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण त्याने चाहत्यांकडे एका फोटोसाठी 100 रूपयांची मागणी केली.

Vaibhav Sooryavanshi: एका फोटोचे 100 रूपये! वैभव सूर्यवंशीने चाहत्यांकडे थेट केली मागणी, Video Viral
Vaibhav Sooryavanshi: एका फोटोचे 100 रूपये! वैभव सूर्यवंशीने चाहत्यांकडे थेट केली मागणी, Video Viral
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 27, 2026 | 4:41 PM

Vaibhav Sooryavanshi Viral Video: आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शतकही ठोकलं. त्यामुळे त्याच्या आक्रमक फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. तसेच दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ होत आहे. असं असताना सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही छोटे चाहते त्याच्या अवतीभवती गराडा घालून होते. यावेळी त्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. पण 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी लहानग्यांना फोटो काढण्यासाठी मिश्किलपणे पैशांची मागणी करत आहे. त्याने फोटो काढण्यासाठी 100-100 रूपये मागितले. राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत वैभव सूर्यवंशीचा मजेशीर अंदाज क्रीडाप्रेमींना पाहायला मिळाला. इतकंच काय तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वैभव सूर्यवंशी मस्करी करत छोट्या चाहत्यांशी बोलत आहे. वैभवने सांगितलं की, ‘भावा, मी पैसे घेतो. आता मी खरं सांगत आहे. फोटोसाठी मी 100 रुपये घेणार.’ वैभव सूर्यवंशीची मागणी पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्यांनी लगेच 200 रुपये आणले. चाहत्यांनी पैसे आणल्याचं पाहून वैभवला हसू आलं आणि लगेच म्हणाला की हा एक प्रँक होता. यानंतर दोन्ही चाहत्यांनी आनंदाने त्याच्यासोबत फोटो काढला. राजस्थान रॉयल्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘बच्चा पार्टी कायम एक पाऊल पुढे’

वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्याने 8 सामन्यात 357 धावा केल्या असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. त्याने 44.63च्या सरासरीने आणि 234.87 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 31 चौकार आमि 32 षटकार मारले आहेत. इतकंच काय तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 36 चेंडूत शतक पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेतील तिसरं वेगवान शतक आहे. यापूर्वी दुसरं वेगवान शतकही त्याच्याच नावावर आहे.

Follow Us