AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: ‘फक्त प्रतिष्ठेवर तुम्ही…’, कपिल देव यांच्यानंतर वेंकटेश प्रसादकडून Virat Kohli टार्गेट

IND vs ENG: विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म कायम आहे. इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याला प्रभाव पाडता आला नाही. दुसऱ्या मॅच मध्ये 1 आणि तिसऱ्या सामन्यात 11 रन्सवर आऊट झाला.

IND vs ENG: 'फक्त प्रतिष्ठेवर तुम्ही...', कपिल देव यांच्यानंतर वेंकटेश प्रसादकडून Virat Kohli टार्गेट
virat-kohli
| Updated on: Jul 11, 2022 | 11:38 AM
Share

मुंबई: विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म कायम आहे. इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याला प्रभाव पाडता आला नाही. दुसऱ्या मॅच मध्ये 1 आणि तिसऱ्या सामन्यात 11 रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीच्या बॅट मधून धावा जणू आटल्या आहेत. त्याचा परफॉर्मन्स सुधारला नाही, तर पुढच्या मालिकेसाठी संघातून वगळण्याचे संकेत निवड समितीने आधीच दिले आहेत. इंग्लंड नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (West Indies Tour) जाणार आहे. तिथे टीम इंडिया तीन वनडे आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. वनडे साठी संघ निवडण्यात आला आहे. पण टी 20 सीरीजसाठी अजूनही संघ निवड झालेली नाही. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील प्रदर्शन पाहून संघ निवडण्यात येणार होता. विडिंज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विराट कोहलीला संघातून डच्चू मिळू शकतो. असं झाल्यास, विराटच्या जागी दुसऱ्याएखाद्या खेळाडूला संधी मिळू शकते. त्याने दमदार प्रदर्शन केलं, तर विराटसाठी पुढचा मार्ग अजून कठीण होऊन बसेल. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्साठी इन फॉर्म दीपक हुड्डाला बसवण्यात आलं.

विराटसाठी इनफॉर्म खेळाडूला वगळलं

त्याच्याजागी विराटला संधी दिली. पण विराट अपयशी ठरला. तेच दीपक हुड्डाने आयर्लंड विरुद्धच्या दोन्ही टी 20 सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. शतक झळकावलं होतं. इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं होतं. विराट फॉर्म मध्ये नसताना, अशा खेळाडूला बाहेर बसवणं, संघाला परवडणारं नाही. विराट कोहलीला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

कपिल नंतर आता वेंकटेश प्रसाद यांची तीच मागणी

आधीच कपिल देव यांनी विराटवर टीक केली आहे. अश्विनला बाहेर बसवलं जातं, मग कोहलीला का नाही? असा सवाल त्यांनी केलाय. आता भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित केलाय.

“एकवेळ अशी होती की, तुमची कितीही प्रतिष्ठा असली, पण तुम्ही फॉर्म मध्ये नसाल, तर तुम्हाला संघातून वगळलं जायच. सौरव, सेहवाग, युवराज, झहीर आणि हरभजन या सगळ्यांना फॉर्म नसल्यामुळे संघातून वगळण्यात आलय. त्यांना देशातंर्गत स्पर्धांमध्ये खेळावं लागलं. त्यांनी धावा केल्या नंतर संघात कमबॅक झालं. तो निकष आता बदलला गेलाय, असं वाटतं. फॉर्म मध्ये नसाल, तर आता विश्रांती दिली जाते. प्रगतीचा कुठलाही मार्ग दिसत नाही. देशात आता खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. प्रतिष्ठेवर तुम्ही खेळू शकत नाही. भारताचे महान मॅच विनर अनिल कुंबळे यांना कित्यकेदा बाहेर बसावं लागलय. काहीतरी मोठं चांगल होण्यासाठी कृती गरजेची आहे” असं वेंकटेश प्रसाद यांनी टि्वट करुन म्हटलं आहे. venktesh prasad

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.