Rohit Sharma : 9 सिक्स-18 फोर, रोहितची चाबूक खेळी, हिटमॅनकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

Rohit Sharma Equal World Record : रोहित शर्मा याने अनेक वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफीत ड्रीम कमबॅक केलं. रोहितची बॅटिंग पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोबा गर्दी केली होती. रोहितने दीडशतकी खेळी करुन चाहत्यांची मनं जिंकली.

Rohit Sharma : 9  सिक्स-18 फोर, रोहितची चाबूक खेळी, हिटमॅनकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
Rohit Sharma Mumbai Vht
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 25, 2025 | 12:39 AM

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 या स्पर्धेची मोठ्या दणक्यात सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या दिवशी 24 डिसेंबरला 1, 2 नाही तर तब्बल 22 फलंदाजांनी शतक झळकावलं. टीम इंडियाच्या माजी कर्णधारांनीही शतक ठोकलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली या जोडीने आपल्या टीमसाठी शतक केलं. या दोघांचंही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2025-26) अनेक वर्षांनी कमबॅक झालं. दोघांनीही आपल्या लौकीकाला शोभेल अशी खेळी केली. रोहितने मुंबईसाठी सिक्कीम विरुद्ध 155 धावांची खेळी केली. रोहितने या खेळीसह वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. रोहितने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हीड वॉर्नर (David Warner) याच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.

हिटमॅनकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

रोहितने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. रोहितने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्डही केले आहेत. तसेच रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला टी 20i वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल 3 द्विशतकं झळकावली आहेत. रोहितने त्याव्यतिरिक्त टी 20i आणि कसोटीतही अनेक विक्रम आपल्या नावावर केली आहेत. रोहितने विजय हजारे ट्रॉफीतील मुंबईच्या पहिल्या सामन्यात झंझावाती खेळी केली.

रोहितने सिक्कीम विरूद्धच्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना दीडशतक झळकावलं. रोहितने 94 बॉलमध्ये 155 रन्स केल्या. रोहितने या खेळीत 18 चौकार आणि 9 षटकार लगावले. रोहित या खेळीसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितची अशी कामगिरी करण्याची ही नववी वेळ ठरली आहे. रोहितने यासह डेव्हिड वॉर्नर याच्या विक्रमाची बरोबरी साधली.

रोहितचं 37 वं लिस्ट ए शतक

तसेच सिक्कीम विरूद्धच्या सामन्यात रोहितने लिस्ट ए कारकीर्दीतील 37 वं शतक झळकावलं. रोहित लिस्ट ए क्रिकेटध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी विराजमान आहे.

लिस्ट ए क्रिकेटध्ये सर्वाधिक शतकं

कुमार संगकारा

ग्रॅहमन हीक

ग्रॅहम गूच

सचिन तेंडुलकर

विराट कोहली

रोहित शर्मा

मुंबईचा दुसरा सामना केव्हा?

दरम्यान मुंबई या मोहिमेतील आपला दुसरा सामना हा शुक्रवारी 26 डिसेंबरला खेळणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात उत्तराखंडचं आव्हान असणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होणार आहे.