AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma Century : रोहित शर्माचा शतकी तडाखा, पहिल्याच सामन्यात हिटमॅनचा जलवा, गोलंदाजांना झोडला

Mumbai vs Sikkim Rohit Sharma VHT : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 7 वर्षांनी दणक्यात कमबॅक केलंय. रोहितने सिक्कीम विरुद्ध तडाखेदार शतक झळकावलं आहे.

Rohit Sharma Century : रोहित शर्माचा शतकी तडाखा, पहिल्याच सामन्यात हिटमॅनचा जलवा, गोलंदाजांना झोडला
Rohit Sharma Century In VhtImage Credit source: PTI
| Updated on: Dec 24, 2025 | 3:42 PM
Share

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अनेक वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2025-2026) दणक्यात कमबॅक केलंय. रोहितने सिक्कीम विरुद्ध झंझावाती शतक झळकावलं आहे. मुंबई विरुद्ध सिक्कीम (Mumbai vs Sikkim) यांच्यातील सामना हा जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. रोहितने या स्टेडियममध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना ही खेळी साकारली आहे. रोहितने फटकेबाजीनेच सुरुवात करत प्रत्येक गोलंदाजाचा पद्धतशीर समाचार घेतला आणि धावा केल्या. रोहितची बॅटिंग पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकच गर्दी केलीय. मात्र सामना लाईव्ह दाखवण्यात येत नसल्याने चाहत्यांनी निराशा झालीय.

सलामी जोडीचा धमाका, मुंबईची स्फोटक सुरुवात

सिक्कीमने मुंबईसमोर 237 धावांचं आव्हान ठेवलं. मुंबईकडून या धावांचा पाठलाग करताना रोहित आणि अंगक्रिष रघुवंशी ही सलामी जोडी मैदानात आली. रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. रोहित सिक्कीमच्या गोलंदाजांवर बॅटने तुटून पडला. तर अंगक्रिषने सातत्याने एकेरी धावा घेत रोहितला स्ट्राईक दिली. रोहितने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

हिटमॅन रोहितचा शतकी तडाखा

रोहितने अर्धशतकानंतर अशीच फटकेबाजी सुरु ठेवली. रोहित आणि अंगक्रिषने सलामी शतकी भागीदारी केली. रोहित शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच अंगक्रिष आऊट झाला. या दोघांनी 118 बॉलमध्ये 141 रन्सची पार्टनरशीप केली. अंगक्रिषने 58 बॉलमध्ये 38 रन्स केल्या.

अंगक्रिषनंतर डेब्यूटंट मुशीर खान मैदानात आला. त्यानंतर रोहितने शतक पूर्ण केलं. रोहितने शतकापर्यंत पोहचण्यासाठी 62 चेंडुंचा सामना केला. रोहितने या खेळीत 8 षटकार आणि 8 चौकार लगावले. रोहितने 162 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रोहितच्या लिस्ट ए क्रिकेटमधील 37 वं शतक ठरलं.

रोहितची चाबूक खेळी

रोहितमुळे न्यूझीलंडला टेन्शन

दरम्यान रोहितच्या या शतकी तडाख्यामुळे न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडिया नववर्षात आणि मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. रोहितची कामगिरी पाहता चाहत्यांना न्यूझीलंड विरुद्धही त्याच्याकडून अशाच कामगिरीची आशा असणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा याने न्यूझीलंड विरुद्धही याच खेळीचा एक्शन रिप्ले दाखवावा, अशी आशा चाहत्यांना आहे.

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.