AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithvi Shaw | 3 शतक 1 द्विशतकांसह 800 धावा, कर्णधार पृथ्वीचा झंझावात, विजय हजारे ट्रॉफीत दमदार ‘शो’

विजय हजारे करंडकातील (vijay hazare trophy 2020 21) एकूण 8 सामन्यात मुंबईचा कर्णधार (prithvi shaw) पृथ्वी शॉने 827 धावा केल्या.

Prithvi Shaw | 3 शतक 1 द्विशतकांसह 800 धावा, कर्णधार पृथ्वीचा झंझावात, विजय हजारे ट्रॉफीत दमदार 'शो'
विजय हजारे करंडकातील (vijay hazare trophy 2020 21) एकूण 8 सामन्यात मुंबईचा कर्णधार (prithvi shaw) पृथ्वी शॉने 827 धावा केल्या.
| Updated on: Mar 14, 2021 | 6:53 PM
Share

नवी दिल्ली | विजय हजारे करंडाकातील अंतिम सामन्यात (Vijay Hazare Trophy Final) मुंबईने उत्तर प्रदेशचा 6 विकेट्सने पराभव केला. यासह मुंबईने चौथ्यांदा विजेतपद पटकावण्याची कामगिरी केली. कर्णधार पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वात मुंबईने ही कामगिरी केली. युपीने मुंबईला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान मुंबईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईकडून आदित्य तरेने 118 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. तर कर्णधार पृथ्वी शॉने 73 धावांची खेळी केली. (vijay hazare trophy 2020 21 mumbai captain prithvi shaw scored 827 run in 8 matches)

पृथ्वीची जबरदस्त कामगिरी

पृथ्वीने या विजय हजारे स्पर्धेत सुरुवातीपासून शानदार कामगिरी केली. पृथ्वीने या स्पर्धेतील एकूण 8 सामन्यात 800 धावांचा टप्पा ओलांडला. पृथ्वी या स्पर्धेतील एका पर्वात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. पृथ्वीने या हंगामात एकूण 8 सामन्यात 1 द्विशतक 3 शतक आणि 1 अर्धशतकासह 165.40 च्या सरासरीने आणि 138.29 की स्ट्राइक रेटसह 827 धावांचा रतीब घातला.

देवदत्त दुसरा फलंदाज

या करंडकात सर्वाधिक धावांच्या बाबतीत पृथ्वीनंतर कर्नाटकाच्या देवदत्त पडीक्कलचा नंबर लागतो. देवदत्तने एकूण 7 सामन्यात 4 शतक आणि 3 अर्धशतकांसह 147.40 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 70 चौकार आणि 21 षटकार फटकावले.

खराब कामगिरीमुळे टीममधून डच्चू

पृथ्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याला वारंवार संधी देऊनही त्याला खेळी साकारता आली नाही. त्याच्यावर चौफेर टीका करण्यात आली. त्यामुळे पृथ्वीला डच्चू देण्यात आला. मात्र त्यानंतर त्याने भारतात परतल्यानंतर जोरदार मेहनत घेतली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सल्ला घेतला. त्यानुसार त्याने रणनिती आखली. सचिन सरांचा सल्ल्यामुळे मी विजय हजारे करंडकात शानदार कामगिरी करु शकलो, असं पृथ्वीने स्पष्ट केलं.

पृथ्वी काय म्हणाला होता?

“मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात परतलो. त्यानंतर सचिन सरांना भेटलो. त्यांनी मला चेंडू शरीराजवळ खेळण्याचा सल्ला दिला. पण मी चेंडू उशिराने खेळत होतो. असं कदाचित मी आयपीएलमध्ये खेळत असल्याने होत असावं. दरम्यान मी सचिन सरांचा सल्ला ऐकला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना यावर फार मेहनत घेतली. मी आतापर्यंत संपूर्ण क्रिकेट बॅट शरीराजवळ न ठेवता खेळलो आहे. पण मला हीच सवय बदलायची होती. हे माझ्यासाठी फार आव्हानात्मक होतं. पण मी यावर फार मेहनत घेतली. सचिन सरांचा सल्ला ऐकला. त्याचा मला फायदा झाला”, असं पृथ्वीने स्पष्ट केलं. पृथ्वीने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळेस तो बोलत होता.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy Final | मराठमोळ्या आदित्य तरेची शतकी खेळी, मुंबईचा युपीवर 6 विकेट्सने शानदार विजय, चौथ्यांदा विजेतेपदावर कोरलं नाव

(vijay hazare trophy 2020 21 mumbai captain prithvi shaw scored 827 run in 8 matches)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.