Vijay Hazare Trophy, Karnataka vs Mumbai, Semi Final | पृथ्वीचा झंझावात, कर्नाटकाला दणका, षटकारांचा पाऊस, चौथं शतक ठोकलं

Vijay Hazare Trophy, Karnataka vs Mumbai, Semi Final | पृथ्वीचा झंझावात, कर्नाटकाला दणका, षटकारांचा पाऊस, चौथं शतक ठोकलं
पृथ्वी शॉचा (prithvi shaw) विजय हजारे स्पर्धतील (Vijay Hazare Trophy) झंझावात कायम आहे. त्याने कर्नाटक विरुद्धच्या सेमी फायनल (mumbai vs karnataka) सामन्यात 79 चेंडूत शतक ठोकलं आहे.

पृथ्वी शॉचा (prithvi shaw) विजय हजारे स्पर्धतील (Vijay Hazare Trophy) झंझावात कायम आहे. त्याने कर्नाटक विरुद्धच्या सेमी फायनल (Karnataka vs Mumbai) सामन्यात 79 चेंडूत शतक ठोकलं आहे.

sanjay patil

|

Mar 11, 2021 | 12:32 PM

दिल्ली : विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) सध्या बाद फेरी सुरु आहे. या बाद फेरीतील दुसरा सेमी फायनल सामना मुंबई विरुद्ध कर्नाटक (Karnataka vs Mumbai) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार युवा पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) पुन्हा एकदा शानदार शतक झळकावलं आहे. या शतकासह पृथ्वीचं हे या मोसमातील मागील 5 सामन्यांमधील तिसरं तर या स्पर्धेतील चौथ शतक ठरलं आहे. (Vijay Hazare Trophy Karnataka vs Mumbai Semi Final 2 prithvi shaw scored 100 in 79 balls)

कर्नाटकाने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईने या निर्णयाचा फायदा उचलला. पृथ्वी आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र 11 धावसंख्या असताना यशस्वी आऊट झाला. यशस्वीनंतर आदित्य तरे मैदानात आला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर तरे 16 धावा करुन बाद झाला. एका बाजूला विकेट जात होते. पण पृथ्वी न डगमगता एक बाजू लावून धरली.

तरे बाद झाल्यानंतर शम्स मुलानी मैदानात आला. शम्सने पृथ्वीला चांगली साथ दिली. या दरम्यान पृथ्वीने कर्नाटकाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पृथ्वीने मैदानाच चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वीने अवघ्या 79 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. पृथ्वीचं हे शतक हे या स्पर्धेतील चौथ शतक ठरलं.

पृथ्वीची शानदार कामगिरी

पृथ्वी या स्पर्धेत सुरुवातीपासून शानदार कामगिरी करतोय. त्याने आतापर्यंत या मोसमातील एकूण 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 230 च्या अधिकच्या सरासरीने आणि 130 च्या स्ट्राईक रेटने 700 पेक्षा अधिक धावा चोपल्या आहेत. यासह पृथ्वी या स्पर्धेतील एका मोसमात 700 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक धावांच्या बाबतीत कर्नाटकाचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल आहे. देवदत्तने सलग 6 सामन्यात 4 शतक आणि 2 अर्धशतकांसह 673 धावा केल्या आहेत.

सामनानिहाय कामगिरी

पृथ्वीने या स्पर्धेतील सुरुवात शतकाने केली. त्याने पहिल्या सामन्यात दिल्ली विरुद्ध 105 धावा केल्या. महाराष्ट्र्र विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 34 धावांची खेळी केली. तिसरा सामना पुड्डेचरी विरोधात खेळवण्यात आला. यावेळस त्याने द्विशतक लगावलं. पृथ्वीने या सामन्यात नाबाद 227 धावा केल्या. राजस्थान विरुद्धच्या चौथ्या सामन्यात 36 धावांची खेळी केली. हिमाचल विरुद्धच्या पाचव्या मॅचमध्ये अयशस्वी ठरला. पृथ्वी 2 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर पृथ्वीने क्वार्टर फायनलमध्ये सौराष्ट्र विरुद्ध 185 धावांची नाबाद खेळी केली. तर कर्नाटक विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शतक ठोकलं.

संबंधित बातम्या :

पृथ्वी शॉची 185 धावांची धमाकेदार खेळी, धोनी आणि विराटचा विक्रम मोडीत

Prithvi Shaw : इंग्लंडविरुद्ध वगळलं, मात्र विजय हजारे ट्रॉफीत बरसला, पृथ्वी शॉचा झंझावात, वेगवान 227* धावा

(Vijay Hazare Trophy Karnataka vs Mumbai Semi Final 2 prithvi shaw scored 100 in 79 balls)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें