विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रेझ, फक्त आठ मिनिटाच तिकीटांचा खेळ खल्लास

नववर्ष 2026 सुरू झालं असून भारतीय क्रिकेट संघ पहिलीच वनडे मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. त्यामुळे आतापासून क्रीडाप्रेमींमध्ये क्रेझ दिसत आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रेझ, फक्त आठ मिनिटाच तिकीटांचा खेळ खल्लास
विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रेझ, फक्त आठ मिनिटाच तिकीटांचा खेळ खल्लास
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 01, 2026 | 8:19 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला बडोद्यामध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली सज्ज झाले आहेत. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत दोघांनी आपला फॉर्म काय आहे तो दाखवून दिला आहे. त्यामुळे त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये क्रेझ आहे. त्याचा अंदाज तुम्हाला तिकीट विक्रीतून येईल. कारण मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तिकीट खिडकी खुली झाली आणि अवघ्या 8 मिनिटात तिकीटं विकली गेली. विराट कोहली आणि रोहित शर्मा करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. तसेच त्यांच्यासाठी हे वर्ष खूपच महत्त्वाचं आहे. पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी या दोघांना या वर्षात खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण या दोघांना वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी फॉर्मही तितकाच महत्त्वाचा आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतली आहे. पण आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे. त्यांच्या फलंदाजीची धार अजूनही कायम आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांनी क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन केलं. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही तशीच अपक्षे आहे. त्यामुळे या दोघांची क्रेझ तिकीट विक्रीतून दिसून येते. विराट कोहलीने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दोन सामन्यात शतक आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तर रोहित शर्माची बॅटही चांगलीच तळपली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही या दोघांच्या फलंदाजीची जादू दिसली होती.

भारत न्यूझीलंड वनडे मालिका वेळापत्रक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून होत आहे. या मालिकेतील पहिला सामना बडोद्याच्या बीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. दुसरा सामना 14 जानेवारीला राजकोटमध्ये आणि तिसरा सामना इंदूरमध्ये होलकर मैदानात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा 2 किंवा 3 जानेवारी होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे.