विराट कोहली अनुष्कासमोर रडला, सामन्यानंतर झालं असं की अश्रूंचा बांध फुटला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु असातना विराट कोहलीबाबत एक खुलासा समोर आहे. विराट कोहली रुममध्ये अनुष्कासमोर रडल्याचं सांगण्यात येत आहे. हा किस्सा ऐकून क्रीडाप्रेमींनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून सध्या खराब फॉर्मातून जात आहे. पर्थ कसोटी शतकी खेळी केली पण त्यानंतर ट्रॅक कायम ठेवण्यात अपयशी झाल्याचं दिसत आहे. असं असताना त्याच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. दुसरीकडे, त्याच्याबाबत एक खुलासा समोर आला आहे. विराट कोहली मैदानावर आक्रमक भूमिकेत दिसतो आणि कोणालाही भिडण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे अशा स्वभावाचा खेळाडू रडणं हे कोणाला पटणारं नाही. पण या खुलाशानुसार विराट कोहली रुममध्ये अनुष्का शर्मासमोर रडला होता. हा खुलासा दुसरं तिसरं कोणी नाही तर बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याने केला आहे. वरुण धवन हा अनुष्का शर्माचा जवळचा मित्र आहे. अनुष्का शर्माने स्वत: ही बाब वरुण धवनसोबत शेअर केली होती. आता वरुण धवनने युट्यूबवरील लोकप्रिय शो टीआरएसमध्ये याबाबत खुलासा केला. पण या माहितीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याशी काही एक संबंध नाही. वरुणने सांगितलेला हा किस्सा इंग्लंडमधील नॉटिंघम कसोटीतील आहे. यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.
वरुण धवनने ‘द रनवीर शो’मध्ये सांगितलं की, नॉटिंघम कसोटी मालिकेत विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा होती. आता सारखाच विराट कोहलीचा फॉर्म काही चांगला नव्हता, असं वरुणने सांगितलं. अनुष्काने त्याची मानसिकता मला सांगितली होती. अनुष्का तेव्हा विराटजवळ नव्हती. पण जेव्हा आली तेव्हा विराट कुठे आहे हे तिला माहिती होतं. शेवटी ती विराटला रुममध्ये भेटली. विराटची मनोबल खचलं होतं. तो अनुष्कासमोर रडत होता आणि सांगत होता की फेल झालो. पण तेव्हा विराटनेच मैदानावर सर्वाधिक धावा केल्या होत्या. वरुणला हे सर्वकाही अनुष्काने सांगितलं होतं.
Guess he’s talking about the Edgbaston test 2018. Or maybe from 2021 Eng tour. pic.twitter.com/8SwzOH7PIT
— iᴍ_Aʀʏᴀɴ18 (@crickohli18) December 19, 2024
वरुण धवनने जे काही सांगितलं तेव्हा विराट कोहलीचा फॉर्म चांगला नव्हता. दुसरं म्हणजे, तेव्हा विराट कोहली कर्णधार होता. पण आता विराट कोहली कर्णधार नाही आणि एक खेळाडू म्हणून संघासोबत आहे. सध्या विराट कोहली खूप अपेक्षा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीसाठी पुढील दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत. अशा स्थितीत विराटकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आता विराट कोहली पुढच्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
