AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : स्टार खेळाडू विराट कोहली याच्यावर ईडी, सीबीआयची रेड? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मीम्सचा पाऊस

सामन्याच्या मैदानाला रणांगणासारखं  रूप आलेलं पाहायला मिळालं होतंं. या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला.

Virat Kohli : स्टार खेळाडू विराट कोहली याच्यावर ईडी, सीबीआयची रेड? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मीम्सचा पाऊस
| Updated on: May 02, 2023 | 8:30 PM
Share

मुंबई : स्टार खेळाडू विराट कोहली आणि लखनऊ संघाचे मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात झालेल्या राड्याचा व्हिडीओ सर्वांनी पाहिला. सामन्याच्या मैदानाला रणांगणासारखं  रूप आलेलं पाहायला मिळालं होतंं. या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. त्यासोबतच सोशस मीडियावर अनेक मीम्स आणि कमेंट्स व्हायरल होताना दिसत आहेत. यातील एक म्हणजे, काही नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता विराट कोहली याच्यावर  सीबीआय, ईडीच्या धाडी पडणार आहेत.

नेमका अर्थ काय?

देशात भारतीय जनचा पक्षाची सत्ता आहे. अनेक राज्यांमध्ये सत्तांतर झालेलं पाहायला मिळालं. ज्या राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं नाही त्यानंतर तिथे ऑपरेशन लोटस पाहायला मिळतं. महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण महाराष्ट्रातील विरोधी पक्षात असलेल्या ज्या नेत्यांनी भाजपविरोधात आवाज उठवला त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत.

अनेकवेळा विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी उघडपणे आरोप केला आहे की, केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून राजकीय फायदा केला जात आहे. याचाच धागा नेटकऱ्यांनी कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या मॅटरशी जोडला आहे.

गौतम गंभीर हा भाजपचा खासदार असून आता विराट कोहलीने त्याच्यासोबत पंगा घेतल्याने आता त्याने सावध राहायला हवं. कधीही विराटवर ईडी, सीबीआय किंवा इनकम टॅक्सची धाड पडू शकते. कोहली आणि गंभीरमध्ये याआधी 2013 मध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली होती. त्यावेळी तर विराट कोहली हा नवखा आणि युवा क्रिकेटपटू होता. मात्र आपल्या आक्रमक स्वभावामुळे त्याने असे अनेक पंगे घेतले आहेत.

दरम्यान,  विराट कोहली मैदानावर असताना समोरच्या संघाची विकेट गेल्यावर बॉलरपेक्षा तो ज्या आक्रमकपणे आनंद साजरा करतो ते पाहून तुम्हाला त्याच्यातील एनर्जीचा अंदाज येत असेल. पण हे जरी खरं असलं तरी कोहलीने आता आवर घालायला हवा कारण अनेक युवा खेळाडू त्याला आदर्श मानतात.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.