Ind vs WI : विराट कोहली याने शतक केलं तर रचला जाणार इतिहास, सचिनही पडणार मागे!

IND vs WI 1 ODI : कसोटी मालिका जिंकल्यानंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रसत्न असणार आहे. या सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहलीकडे इतिहास रचण्याची संधी आहे.  मात्र यासाठी त्याला या सामन्याम्यध्ये शतक करावं लागणारं आहे. 

Ind vs  WI : विराट कोहली याने शतक केलं तर रचला जाणार इतिहास, सचिनही पडणार मागे!
Harish Malusare | Updated on: Jul 27, 2023 | 8:56 PM

मुंबई :  भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिला एकदिवसीय सामना ब्रिजटाऊन बारबाडोस येथे सुरू आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी मालिका जिंकल्यानंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रसत्न असणार आहे. या सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहलीकडे इतिहास रचण्याची संधी आहे.  मात्र यासाठी त्याला या सामन्याम्यध्ये शतक करावं लागणारं आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत 274 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 12898 धावा केल्या असून तो आता 13 हजार धावा पूर्ण करण्यापासून 102 धावा दूर आहे. कोहलीने आजच्या सामन्यामध्ये 102 धावा केल्या तर तो मोठा इतिहास रचणार आहे.

वन डे क्रिकेटमध्ये 13 हजारांपेक्षा जास्त धावा फक्त 4 खेळाडूंनी केल्या आहेत. विराट कोहली पाचवा खेळाडू होईल जो 13 हजार धावा पूर्ण करेल. याआधी पाँटिंगने 341, संगकाराने 363 आणि जयसूर्याने 416 डावात तर सचिन तेंडुलकरने 313 डावांमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहली आता सर्वात कमी डावांमध्ये 13 हजार धावा करणारा खेळाडू होणार आहे. विराट कोहली कोहली सर्वात जलद 10, 11 आणि 12 हजार वनडे धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे.

सामन्याचा धावता आढावा:-

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा भारतीय वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्ससमोर टिकाव लागू शकला नाही. 20 ओव्हरमध्ये कॅरेबियन संघाची धावसंख्या 107-7 आहे. यामध्ये रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3, शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या होत्या. मैदानात आता कर्णधार शाई होप 36 धावांसह खेळत असून त्याने एक बाजू लावून धरली आहे.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.

Follow Us