AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies 1st ODI : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला लॉटरी, तब्बल 10 वर्षांनी संघात कमबॅक

टीम इंडियाच्या कसोटी संघामध्ये या खेळाडूने 12 वर्षांनी एन्ट्री केली होती. त्यानंतर आता एकदिवसीय सामन्यामध्ये आता या खेळाडूने 10 वर्षांनी परत एकदा स्थान मिळवलं आहे.

India vs West Indies 1st ODI  : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला लॉटरी, तब्बल 10 वर्षांनी संघात कमबॅक
| Updated on: Jul 28, 2023 | 2:00 AM
Share

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिला एकदिवसीय सामना काही वेळात सुरू होणार आहे. या सामन्याचा टॉस झाला असून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता वनडे मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूने तब्बल 10 वर्षांनी संघात पुनरागमन केलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडियाच्या कसोटी संघामध्ये या खेळाडूने 12 वर्षांनी एन्ट्री केली होती. त्यानंतर आता एकदिवसीय सामन्यामध्ये आता या खेळाडूने 10 वर्षांनी परत एकदा स्थान मिळवलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जयदेव उनाडकट आहे. जयदेवने शेवटचा वनडे सामना 2013 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कोची येथे खेळला होता. आता वेस्ट इंडिजविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याला संधी मिळाली आहे. कसोटी सामन्यातही तो प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसला होता.

जयदेव उनाडकटने शेवटचा कसोटी सामना 2010 मध्ये सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात परत एकदा कमबॅक केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार प्रदर्शन करत  परत एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. जयदेव उनाडकटने 7 वनडे खेळले असून त्यामध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये  4 सामन्यांमध्ये 3 आणि 10 टी-20 सामन्यांमध्ये जयदेवने 14 विकेट्स घेतल्या आहेत.

वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ :-

भारताचा संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेईंग 11 :-

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.