एकदिवसीय मालिकांचा हुकमी एक्का ! विराट कोहली ICC ODI रँकिंगमध्ये पहिला

एकदिवसीय मालिकांचा हुकमी एक्का ! विराट कोहली ICC ODI रँकिंगमध्ये पहिला
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टी 20 रँकिंगमध्ये फटका बसला असला तरी एकदिवसीय सामन्यांच्या रँकिंगमध्ये कोहली नंबर वनच ठरला आहे (Virat Kohli is number one batsman in ICC ODI).

चेतन पाटील

|

Mar 31, 2021 | 9:41 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टी 20 रँकिंगमध्ये फटका बसला असला तरी एकदिवसीय सामन्यांच्या रँकिंगमध्ये कोहली नंबर वनच ठरला आहे. कोहलीन इंग्लंड विरोधाच्या वनडे सीरिजमधील पहिल्या दोन सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याने पहिल्या दोन सामन्यात 56 आणि 66 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचं ICC ODI रँकिंगमधील पहिला नंबर अबाधित आहे. विशेष म्हणजे त्याचे आता 870 गुण झाले आहेत (Virat Kohli is number one batsman in ICC ODI).

भारतीय संघाचे इतर खेळाडू कोणत्या रँकवर?

विराट कोहली पाठोपाठ टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यांच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सध्या पाकिस्तानचा बाबर आजम आहे. दरम्यान, इंग्लंड विरोधातील सामन्यात चांगली कामगिरी केल्याने के एल राहुल याला देखील चांगला फायदा झाला आहे. के एल राहुल हा 31 व्या स्थानावरुन थेट 27 नंबरवर आला आहे. तर हार्दिक पांड्या 42 व्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे पांड्याची ही वनडे करिअरमधील बेस्ट रँकिंग आहे. दुसरीकडे रिषभ पंतनेही टॉप 100 खेळाडूंच्या यादीत आपलं स्थान निश्चित केलं आहे (Virat Kohli is number one batsman in ICC ODI).

भारतीय गोलंदाज कितव्या स्थानी?

इंग्लंड विरोधाच्या सीरिजमधील शेवटच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 42 धावा देवून 3 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीचा त्याला चांगला फायदा झालाय. भुवनेश्वर आता थेट 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे 2017 मध्ये तो 10 व्या क्रमांकावर आला होता. त्यानंतर त्याचा नंबर खाली घसरला होता. मात्र, चार वर्षांनी पुन्हा तो 11 व्या स्थानावर पोहोचला आहे.

बुमराह चौथ्या तर शार्दुल 80 व्या स्थानी

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा या यादीत सध्या चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आधी तो तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, लग्नाच्या निमित्ताने तो इंग्लंड विरोधातील सीरिज न खेळू शकल्यामुळे तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.शार्दुल ठाकूरने इंग्लंड विरोधातील सीरिजच्या शेवटच्या सामन्यात चार विकेट घेऊन 67 धावा ठोकल्या. त्याच्या या कामगिरीचा त्याला चांगलाच फायदा झाला. तो 92 व्या रँकिंगवरुन थेट 80 व्या रँकिंगवर पोहोचला आहे.

हेही वाचा : आयपीएल आधी या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 17 वर्षांचं क्रिकेट करिअर, दिल्लीच्या संघातही समावेश

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें