AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Angry : विराट भरमैदानात अंपायरवर तापला, कोहली आऊट की नॉटआऊट? व्हीडिओ व्हायरल

Virat Kohli Angry On Umpire IPL 2024 KKR vs RCB : केकेआर विरुद्धचा सामना हा आरसीबीसाठी करो या मरो असा आहे. अशा सामन्यात वादग्रस्तरित्या बाद दिल्याने विराट कोहली अंपायरवर चांगलाच संतापला. विराटच्या रागरागीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Virat Kohli Angry : विराट भरमैदानात अंपायरवर तापला, कोहली आऊट की नॉटआऊट? व्हीडिओ व्हायरल
Virat Kohli Angry on umpire,Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Apr 21, 2024 | 6:51 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात जोरदारा राडा पाहायला मिळाला. आपल्या आक्रमक बॅटिंग आणि तापट स्वभावासाठी ओळखळ्या जाणाऱ्या विराट कोहलीचा पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना रौद्र अवतार पाहायला मिळाला. वादग्रस्तरित्या बाद दिल्याने विराटला संताप अनावर झाला. त्यानंतर विराट जाऊन थेट फिल्ड अंपायरशी भिडला. विराटने या निर्णयाबाबत पंचांकडे नाराजी व्यक्त केली आणि आपला राग व्यक्त केला. मात्र आऊट दिल्यामुळे विराटला नाईलाजाने मैदानाबाहेर जावं लागंल. नक्की हा वाद कशामुळे झाला? हे आपण जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

आरसीबीकडून फाफ कॅप्टन डु प्लेसीस आणि विराट कोहली ही सलामी जोडी 223 धावांचं पाठलाग करायला मैदानात आली. या दोघांनी आक्रमक सुरुवात केली. या सलामी जोडीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये नाबाद 27 धावा जोडल्या. त्यानंतर हर्षित राणा आरसीबीच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला. विराट कोहली स्ट्राईक एंडवर होता. हर्षितने टाकलेला पहिला बॉल विराटने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षितने आपल्याच बॉलिंगवर विराटचा कॅच घेतला. अंपायरने विराटला बाद घोषित केलं. हर्षितने विकाटला टाकलेला पहिला बॉल कंबरेवर होता. त्यामुळे विराटने अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देत रीव्हीव्यू घेतला. मात्र थर्ड अंपायरनेही फिल्ड अंपायरचा निर्णय योग्य ठरवला आणि विराट बाद असल्याचंच सांगितलं.

विराटला थर्ड अंपायरकडून नाबादचा निर्णय अपेक्षित होता. विराट जरी क्रीझमधून बाहेर येऊन हा शॉट खेळला. मात्र तो टाचेवर उभा राहून खेळला. त्यामुळे विराटची उंचीत वाढ झालेला. मात्र हर्षीतने टाकलेला बॉल कंबरेवर होता. त्यामुळे आऊट न देता नो बॉल असायला पाहिजे होता, असं विराटचं मत होतं. मात्र विराटच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे विराटने थेट अंपायरशीच वाद घातला. विराटला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे. तसेच “मी छाती ठोकून सांगतो की विराट कोहली नाबाद होता”, असं माजी क्रिकेटपटून आणि कॉमेंटेटर नवज्योत सिंह सिद्धू कॉमेंट्री दरम्यान म्हणाले.

विराट कोहलीचा संताप

दरम्यान आऊट झाल्यानंतर विराट डगआऊटमध्ये न थांबता थेट ड्रेसिंग रुमच्या दिशेने गेला. ड्रेसिंग रुमच्या एन्ट्रान्सच्या इथे पोहचण्याआधी बॅट आपटली. त्यानंतर विराटने कचऱ्याच्या डब्ब्यावर आपला राग काढला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?
विरोधी पक्षनेता कोण होणार? उदय सामंत यांच्या विधानाने कुणाला धक्का?.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविनाच अधिवेशन, सत्ताधारी-विरोधकात संघर्ष.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.