Virat Kohli : विराट कोहलीचे ते 5 डाव, त्या कामगिरीमुळे विराट नेहमी चर्चेत, आजचा दिवसही स्पेशल, जाणून घ्या…

कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च खेळी विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली गेली. या सामन्यात त्याने संघासाठी 129 चेंडूत नाबाद 157 धावा काढल्या. यादरम्यान 13 चौकार आणि चार उत्कृष्ट षटकार मारले.

Virat Kohli : विराट कोहलीचे ते 5 डाव, त्या कामगिरीमुळे विराट नेहमी चर्चेत, आजचा दिवसही स्पेशल, जाणून घ्या...
विराट कोहली
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

Aug 18, 2022 | 9:31 AM

नवी दिल्ली : आजच्या दिवशीच एकदिवसीय क्रिकेटमधील (Cricket) पहिला सामना विराट कोहली यानं (Virat Kohli) खेळला होता. तो 2008 मध्ये खेळला. श्रीलंका दौऱ्यावर यजमान संघाविरुद्ध डंबुला येथे वनडे (One Day Match) पदार्पण करण्याची संधी त्यावेळी विराटला मिळाली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्यानं माजी सलामीवीर गौतम गंभीरसह डावाची सुरुवात केली आणि 22 चेंडूत 12 धावा करण्यात यश मिळवले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चौकार आला. पदार्पणाच्या सामन्यात कोहली श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराचा बळी ठरला. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजाने त्याला एलबीडब्ल्यू करताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केल्यापासून त्याने देशासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 262 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटने 253 डावांमध्ये 57.7 च्या सरासरीने 12344 धावा केल्या आहेत.

ऐतिहासिक डाव 18 मार्च 2012

 1. 18 मार्च 2012 रोजी या दिवशी त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी खेळली होती.
 2. त्याने मीरपूरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 148 चेंडूत 183 धावा केल्या होत्या.
 3. कोहलीच्या बॅटमधून 22 चौकार आणि एक शानदार षटकार निघाला.
 4. टीम इंडियाने पाकिस्तान संघाने दिलेले 330 धावांचे लक्ष्य 13 चेंडू बाकी असताना 4 गडी गमावून सहज गाठले.
 5. कोहलीच्या या उत्कृष्ट खेळीमुळे हे यश मिळालं
 6. या एकदिवसीय सामन्यातील शतकासाठी कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.

सर्वाधिक धावा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत कोहली सध्या सहाव्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या पुढे फक्त महेला जयवर्धने (12650), सनथ जयसूर्या (13430), रिकी पाँटिंग (13704), कुमार संगकारा (14234) आणि सचिन तेंडुलकर (18426) आहेत.

केपटाऊनमध्येची मजबूत खेळी

 1. विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च खेळी
 2. 7 फेब्रुवारी 2018 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये आली.
 3. या डावात टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 159 चेंडूत नाबाद 160 धावा केल्या.
 4. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 12 चौकार आणि दोन उत्कृष्ट षटकार आले.
 5. कोहलीच्या या सुरेख खेळीमुळे भारतीय संघ हा सामना 124 धावांनी जिंकण्यात यशस्वी झाला.

उत्कृष्ट षटकार

कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च खेळी विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली गेली. या सामन्यात त्याने संघासाठी 129 चेंडूत नाबाद 157 धावा काढल्या. यादरम्यान त्यानं 13 चौकार आणि चार उत्कृष्ट षटकार मारले. या सामन्याबद्दल बोलल्यास कोहलीच्या या सुरेख खेळीनंतरही हा सामना बरोबरीत सुटला.

16 चौकार

कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील चौथी सर्वोच्च खेळी 23 ऑक्टोबर 2016 रोजी न्यूझीलंडविरुद्ध मोहाली येथे पाहायला मिळाली. या सामन्यात संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 134 चेंडूत नाबाद 154 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमध्ये 16 चौकार आणि एक जबरदस्त षटकार लागला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें