AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman gill : ‘सारा भाभी, सारा भाभी…’, Live मॅचमध्ये विराटने सुद्धा घेतली शुभमन गिलची मजा, VIDEO

Shubman gill : शुभमन गिलचा विषय निघाला की, सारा तेंडुलकरच नाव येतच. मैदानात सामना सुरु असताना, प्रेक्षक शुभमन गिलची फिरकी घेत होते. फक्त प्रेक्षकच नाही, भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने सुद्धा प्रेक्षकांच्या या घोषणाबाजीवर रिएक्ट केलं.

Shubman gill : ‘सारा भाभी, सारा भाभी…', Live मॅचमध्ये विराटने सुद्धा घेतली शुभमन गिलची मजा, VIDEO
shubhaman-sara
| Updated on: Jan 26, 2023 | 1:46 PM
Share

इंदोर – टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये 3-0 ने क्लीन स्वीप केलं. शुभमन गिल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने या सीरीजमध्ये एकूण 2 सेंच्युरीसह 360 धावा केल्या. गिलने पहिल्यांदा डबल सेंच्युरी झळकवली. त्यानंतर शेवटच्या तिसऱ्या वनडेमध्ये सुद्धा शतकी खेळी केली. या दोन्ही सामन्यात पूर्णवेळ गिलचीच चर्चा होती. गिलच्या बॅटिंगने प्रेक्षकांना खूश केलं. शुभमन गिलचा विषय निघाला की, सारा तेंडुलकरच नाव येतच. मैदानात सामना सुरु असताना, प्रेक्षक शुभमन गिलची फिरकी घेत होते. फक्त प्रेक्षकच नाही, भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने सुद्धा प्रेक्षकांच्या या घोषणाबाजीवर रिएक्ट केलं.

दोन ठिकाणी प्रेक्षकांकडून घोषणा

हैदराबाद आणि इंदोर वनडेमध्ये शुभमन गिलला पाहून प्रेक्षकांनी सारा भाभी, सारा भाभी अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्या. तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर 50 ओव्हर्समध्ये 9 बाद 385 धावा केल्या. त्यानतंर टीम इंडियाने 41.2 ओव्हर्समध्ये 295 धावांवर न्यूझीलंडचा डाव आटोपला. 90 रन्सनी टीम इंडियाने हा सामना जिंकला. भारताने श्रीलंकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप केलं.

कोहलीची मस्ती

भारताच्या प्रदर्शनाने प्रेक्षक खूश होते. गिलची फिरकी सुरु असताना कोहलीने सुद्धा मस्ती केली, त्यामुळे प्रेक्षकही हैराण झाले. मॅच दरम्यान काही प्रेक्षक गिलला पाहून सारा, सारा नावाने घोषणा दिल्या. शुभमन गिलच नाव मागच्या दोन-तीन वर्षांपासून सारा तेंडुलकरशी जोडलं जातय. दोघांपैकी कोणीही या नात्यावर कधीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. सोशल मीडियावर या घोषणांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

नंबर वन टीम

इंदोरमधील विजयासह टीम इंडिया वनडे क्रिकेटमध्ये नंबर 1 टीम बनली आहे. टीम इंडियाचे एकूण 114 पॉइंट्स आहेत. गिलची बॅट या सीरीजमध्ये खूप चालली. पण कोहलीची बॅट फार गरजली नाही. त्याने 3 सामन्यात एकूण 55 धावा केल्या. शुभमन गिलने सचिन आणि कोहलीमध्ये कोणाला निवडलं?

मॅचनंतर शुभमन गिलने सचिन तेंडुलकरची नाही, विराट कोहलीची सरस खेळाडू म्हणून निवड केली. सामन्यानंतर एका इंटरव्यूमध्ये गिलला कोहली आणि तेंडुलकरमध्ये सर्वोत्तम खेळाडू निवडण्यास सांगितलं. गिलने कोहलीची निवड केली. यामागच कारणही त्याने सांगितलं. क्रिकेटमध्ये कोहलीमुळे इंटरेस्ट वाढल्याच शुभमनने सांगितलं. पण वडिलांनी सचिनच्या प्रभावामुळेच त्याला नेटमध्ये पाठवलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.