AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat kohli vs Gautam Gambhir : Naveen ul Haq-गौतम गंभीरने मिळून पुन्हा विराटचा अपमान केला?

Virat kohli vs Gautam Gambhir IPL 2023 : 'त्या' पोस्टमध्ये Naveen ul Haq ने काय म्हटलय? आणि गौतम गंभीरची त्यावर काय आहे Reaction? पुन्हा नव्याने वाद उफाळून येऊ शकतो.

Virat kohli vs Gautam Gambhir : Naveen ul Haq-गौतम गंभीरने मिळून पुन्हा विराटचा अपमान केला?
Virat kohli vs Gautam Gambhir IPL 2023
| Updated on: May 07, 2023 | 2:09 PM
Share

लखनौ : आयपीएलच्या चालू आठवड्याची सुरुवात वादाने झाली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्समधील सामना जय-पराजयापेक्षा वादामुळे जास्त गाजला. विराट कोहली एकटा लखनौच्या टीममधील तिघांना भिडला. मॅच संपल्यानंतर विराट कोहलीच अफगाणिस्तानचा नवीन उल हक आणि लखनौ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर बरोबर बरच वाजलं. या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या भांडणाची शिक्षा म्हणून विराट आणि गौतमची शंभर टक्के मॅच फी कापण्यात आली. नवीन उल हकला सुद्धा शिक्षा मिळाली. जे काही झालं, ते क्रिकेटसाठी चांगल नव्हतं, असंच सगळ्यांच मत आहे.

विराट विरुद्ध गंभीर नव्याने उफाळून येऊ शकतो वाद

हा वाद आता कुठे शांत होत असताना, नवीन उल हक आणि गौतम गंभीरने मिळून पुन्हा एकदा विराट कोहलीची कळ काढली आहे. दोघांनी शनिवारी एका उपरोधिक पोस्टमधून विराट कोहलीला लक्ष्य केल्याची चर्चा आहे. हे तिघेही सर्व वादाच्या केंद्रस्थानी आहेत. नवीन उल हकच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे नव्याने वाद उफाळून येऊ शकतो.

इन्स्टापोस्टमध्ये नवीन उल हकने काय लिहिलय?

“लोकांनी आपल्याला ज्याप्रकारे वागणूक द्यावी असं वाटतं, तशीच वागणूक तुम्ही लोकांना द्या. त्यांनी तुमच्याशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे याबद्दल अपेक्षा असेल तर तुम्हीसुद्धा त्यांच्याशी तसंच बोला” असं नवीन उल हकने त्याच्या इन्स्टापोस्टमध्ये म्हटलय. सोबत त्याने गौतम गंभीरचा फोटो पोस्ट केलाय. नवीनच्या या पोस्टवर गौतम गंभीरने कमेंट करताना ‘जसा आहेस तसा राहा, बदलू नकोस’ असं म्हटलय. मॅचमध्ये काय झालेलं?

आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये शाब्दीक वादावादी वाढत गेली. अन्य खेळाडूंना मध्ये येऊन दोघांना लांब कराव लागलं. या भांडणाआधी मॅच सुरु असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात सामना सुरु असताना वाजलं होतं. विराटने नवीन उल हकला बूट सुद्धा दाखवला होता.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.