विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार की नाही! ब्रायन लाराने वर्तवलं असं भाकीत

विराट कोहली याची क्रिकेटविश्वात रनमशिन म्हणून ख्याती आहे. विराट कोहलीचा फिटनेस क्रीडारसिक चाहते आहेत. विराटने आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासात अनेक विक्रम रचले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रमही मोडीत काढला आहे. आता नव्या विक्रमाकडे त्याची वाटचाल सुरु झाली आहे. पण हा विक्रम गाठणं शक्य आहे का? याबाबत ब्रायन लाराने आपलं भाकीत वर्तवलं आहे.

विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार की नाही! ब्रायन लाराने वर्तवलं असं भाकीत
विराट कोहली खरंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विश्वविक्रम मोडणार का? ब्रायन लाराने सांगितलं असं काही
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 5:48 PM

मुंबई : वेस्ट इंडिडचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याने क्रिकेटबाबत अनेक भाकीतं वर्तवली आहेत. शुबमन गिलबाबतही त्याने मोठी भविष्यवाणी केली आहे. कसोटीतील नाबाद 400 धावांचा विक्रम मोडीत काढेल असं सांगितलं आहे. आता पुन्हा एकदा ब्रायन लारा नव्या भाकीतामुळे चर्चेत आला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या शतकांचं शतक हा रेकॉर्ड मोडण्याच्या विक्रमाबाबत त्याने सांगितलं आहे. विराट कोहली हा विक्रम मोडेल की नाही याबाबत त्याने आपलं भाकीत वर्तवलं आहे. सचिन तेंडुलकर याने कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतकं केली आहेत. यानंतर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने कसोटीत 29, वनडे 50 आणि टी20 मध्ये एक शतक झळकावत 80 शतकं केली आहेत. त्यामुळे सचिनच्या शतकांच्या विक्रमाजवळ असल्याचं बोललं जात आहे. पण ब्रायन लाराने याबाबत सांगताना म्हणाला की, विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या शतकांचं शतक करणं खूपच कठीण आहे.

ब्रायन लाराने सांगितलं की, “कोहलीचं वय आता किती आहे? तो 35 वर्षांचा आहे. त्याने 80 शतकं ठोकली आहेत आणि हा विक्रम मोडण्यासाठी 20 शतकांची गरज आहे. जर त्याने एका वर्षात पाच शतकं करण्याचं ठरवलं तर त्याला सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी चार वर्ष लागतील. कोहली तिथपर्यंत 39 वर्षांचा होईल. तेव्हा अशी कामगिरी करणं खूपच कठीण आहे.”

“जे लोक कोहली सचिनचा विक्रम मोडीत काढेल असं सांगतात ते वास्तुस्थितीवर आधारित नाही. 20 शतकं म्हणजे खूप आहेत. काही क्रिकेटपटू पूर्ण कारकिर्दित इतकी शतकं करत नाही. त्यामुळे कोहली असं करू शकेल ही मी लॉजिक सोडून बोलणार नाही. वय कोणासाठीही थांबत नाही. कोहली आणखी बरेच विक्रम मोडीत काढेल. पण सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडीत काढणं कठीण आहे.”, असंही ब्रायन लारा म्हणाला.

“कोहली सचिनच्या विक्रमाजवळ येऊ शकतो. पण तरीही 100 शतकांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. जर त्याने शतकांचं शतक केलं तर मला आनंदच होईल.”, असंही ब्रायन लारा याने पुढे सांगितलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर विराट कोहलीने वनडे आणि टी20 क्रिकेटमधून आराम घेतला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात खेळणार आहे.

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.