AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: Virat Kohli च्या सेंच्युरीच पाकिस्तानमध्ये सेलिब्रेशन, कोहलीचा जयजयकार

Virat Kohlis 46th century cheered in Pakistan: या इनिंगची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा आहे. विराटच्या या सेंच्युरीच फक्त भारतातच नाही, तर शेजारच्या पाकिस्तानातही सेलिब्रेशन झालं.

IND vs SL: Virat Kohli च्या सेंच्युरीच पाकिस्तानमध्ये सेलिब्रेशन, कोहलीचा जयजयकार
| Updated on: Jan 16, 2023 | 11:37 AM
Share

Virat Kohlis 46th century cheered in Pakistan: श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहली 166 धावांची तडाखेबंद इनिंग खेळला. या इनिंगची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा आहे. विराटच्या या सेंच्युरीच फक्त भारतातच नाही, तर शेजारच्या पाकिस्तानातही सेलिब्रेशन झालं. विराट कोहलीच्या पाकिस्तानातील चाहत्यांनी त्याच्या सेंच्युरीच सोशल मीडियावर कौतुक केलं. पाकिस्तानी क्रिकेटर्सनीही विराट कोहलीच्या शतकाच भरभरुन कौतुक केलं. तीन मॅचच्या वनडे सीरीजमध्ये शेवटच्या सामन्यात विराटने श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेतला. 110 चेंडूत 166 धावा फटकावून टीमचा स्कोर 391 धावांपर्यंत पोहोचवला.

फक्त चार शतकं दूर

विराट कोहलीने या शतकासोबतच अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकवण्याच्या बाबतीत विराट आता सचिनपासून फक्त तीन शतकं दूर आहे. विराट कोहलीने 46 शतक झळकावली आहेत. आणखी चार शतकांनंतर तो सचिनचा वनडेमधील 49 शतकांचा रेकॉर्ड मोडेल.

कामरान अकमलने काय लिहिलय?

कोहलीच्या बॅटिंगच कौतुक करताना पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंची टि्वट केलय. यात कामरान अकमलच टि्वट खास आहे. त्याने विराट कोहली हा या युगाचा बॉस असल्याच म्हटलं आहे. कामरान अकमलने आपल्या टि्वटमध्ये विराट कोहलीचा जयजयकार केलाय. ‘रन मशीन, द किंग, कोहलीच 46वं वनडे शतक… तो या युगाचा बॉस आहे’ असं कामरानने टि्वटमध्ये म्हटलय.

पाकिस्तानी क्रिकेट हसन अली म्हणातो…

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीने सुद्धा कोहलीच कौतुक करताना टि्वट केलय. ‘कोहलीला 46 व्या शतकाच्या शुभेच्छा’. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठानने सुद्धा कौतुक केलय. विराट कोहलीने सीरीजची सुरुवात शतकाने केली आणि शेवटही शतकानेच केला असं इरफानने म्हटल. या सामन्यात विराट कोहलीने 8 सिक्स आणि 13 फोरसह 110 चेंडूत नाबाद 166 धावा केल्या. त्याच्या करिअरची ही दुसरी सर्वश्रेष्ठ इनिंग आहे. विराटच हे कितवं शतक?

त्याने 74 व आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. या सीरीजमधील त्याची ही दुसरी सेंच्युरी आहे. त्याने 85 चेंडूत आपलं 46 व वनडे शतक पूर्ण केलं. कोहलीच्या शतकाची क्रिकेट विश्वात चर्चा सुरुच आहे. पण त्याचवेळी त्याने मारलेल्या एका सिक्सची सुद्धा तितकीच चर्चा आहे. सेंच्युरी मारल्यानंतर त्याने तो सिक्स मारला.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.