विराट कोहलीचा धुरंदर, 46 चेंडूत ठोकलं शतक, नंतर दारुच्या नशेत संपवलं करीयर

एकदिवसीय क्रिकेटसह कसोटी क्रिकेटमध्येही एक तगडा फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाडूने 2011 च्या विश्वचषकातही चांगली कामगिरी केली होती.

विराट कोहलीचा धुरंदर, 46 चेंडूत ठोकलं शतक, नंतर दारुच्या नशेत संपवलं करीयर
जेसी रायडर
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 12:09 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे त्यांच्या खेलाप्रमाणे खाजगी जीवनात मात्र चांगली कामगिरी करु शकले नाहीत. त्यांच्या वागणूकीमुळे ते स्वत: त्यांच करीयर संपवतात. असाच एक खेळाडू म्हणजे विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स संघातील महत्त्वाचा माजी खेळाडू जेसी रायडर (Jesse Ryder). न्यूझीलंड संघाचा क्रिकेटपटू जेसी रायडर ने एकदा 46 चेंडूत शतक ठोकलं होतं. पण नंतर दारु, मारामारी अशा वाईट सवयींमुळे त्याची क्रिकेट कारकिर्द संपली. आज जेसीचा वाढदिवस असून 6 ऑगस्ट 1984 रोजी न्यूझीलंडच्या वेलिंगटन येथे त्याचा जन्म झाला होता.

कीवी टीमकडून त्याने  18 टेस्‍ट, 48 वनडे आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीकडून खेळला आहे. रायडर आरसीबी संघासोबत 2009 मध्ये जोडला गेला होता. त्यावेळी तो 2009 ते 2012 पर्यंत पुणे वॉरियर्स संघात होता. त्याने त्यावेळी 29 सामन्यात 604 धावा करत 8 विकेट्सही घेतल्या. 1 जानेवारी 2014 मध्ये कोरी अँडरसनने ज्या सामन्यात 36 चेंडूत सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. त्याच सामन्यात रायडरने 46 चेंडूत 104 धावा केल्या होत्या.

एका मागोमाग एक संकटं

जेसी रायडरचं आयुष्य सतत संकटामध्ये अडकलेलं होतं. 2008 मध्ये आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या देसीने वनडे आणि टेस्‍टमधलं पहिलं शतक भारता विरुद्धच ठोकलं होतं. 2012 मध्ये त्याला अधिक दारु पिण्याच्या सवयीसाठी रिहॅबिलिटेशनमध्ये पाठवण्यात आलं. त्यावर्षी न्यूझीलंड संघाने त्याच सेंट्रल कांट्रेक्‍ट ही कॅन्सल केलं होतं. त्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असतानाच मार्च, 2013 मध्ये क्राइस्‍टचर्चमध्ये मारामारीच्या आरोपाखाली तो पुन्हा अडकला.त्यानंतर वर्षभरानंतर परत संघात आलेल्या जेसीने 2014-15 मध्ये भारत दौऱ्यात पुनरागमन केलं पण फिटनेसमुळे त्याला खेळवलं गेलं नाही. त्यानंतर 2015 वर्ल्‍ड कपनंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दच संपुष्टात आली.

राइडर का करियर प्रोफाइल

न्‍यूझीलंड संघाकडून खेळताना जेसीने 18 कसोटी सामन्यात 40.93 च्या सरासरीने 1 हजार 269 रन बनवले. ज्यात तीन शतकांसह सहा अर्धशतकांचा समावेश आहे. 201  हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. त्याने टेस्‍टमध्ये पाच विकेटही घेतले आहेत. तर 48 वनडेमध्ये 33.21 च्या सरासरीने त्याने तीन शतकं आणि सहा अर्धशतकं करत 1 हजार 362 रन्स केले आहेत. तसेच 12 विकेटही घेतल्या आहेत.

हे ही वाचा

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच विराट पराभूत, ‘या’ गोष्टी सर्वाधिक पराभवाचा रेकॉर्ड नावावर

वडिलांना आठवून विराट झाला भावूक, म्हणाला, ‘मी बसून फक्त हाच विचार करतो की…

(Virat kohlis rcb player new zealand cricketer jesse ryder birthday today)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.