IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच विराट पराभूत, ‘या’ गोष्टी सर्वाधिक पराभवाचा रेकॉर्ड नावावर

विराट कोहली भारताचा एक यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नावावर असे अनेक रेकॉर्डही आहेत. पण इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या सुरुवातीलाच एख खराब रेकॉर्डही त्याच्या नावावर झाला आहे.

1/5
भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team)   कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli)  नेतृत्त्वाखाली इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये उत्तम सुरुवात केली. इंग्लंडला अवघ्या183 धावांवर सर्वबाद करत सामन्यावर पकड बसवली. सामना सुरु झाल्यानंतर विराटसेनेने उत्तम कामगिरी केली खरी पण सामन्याच्या सुरुवातीला मात्र कर्णधार विराटने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा नाणेफेक पराभूत होणारा कर्णधार विराट बनला आहे.

2/5
नॉटिंघम येथील पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट पुन्हा एकदा नाणेफेक हारला. विराट  62 व्या वेळेस भारतीय संघाचा टेस्ट कर्णधार असून 35 व्या वेळेस तो  नाणेफेकीत पराभूत झाला आहे. यासोबतच सर्वाधिक वेळा कसोटी सामन्यांत टॉसमध्ये पराभूत होणारा भारतीय कर्णधार बनला आहे.

3/5
विराटनंतर सर्वाधिक नाणेफेक पराभूत होण्यात नंबर लागतो माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) धोनीने 60 कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्त्व केले असून 34 वेळा तो टॉस जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे.

4/5
धोनी आणि कोहलीसह भारताचा दिग्गद कर्णधार सौरव गांगुलीने देखील सर्वाधिक वेळा नाणेफेक गमावली आहे. 49 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या गांगुलीला 28 वेळा नाणेफेकीत पराभव मिळाला आहे.

5/5
या सर्वांनंतर नंबर लागतो महान फलंदाज सुनील गावस्करचा (Sunil Gavaskar) 47 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या गावस्करांनी 25 वेळा नाणेफेक गमावली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI