AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

.. तर आयपीएलच्या पुढच्या पर्वातून पत्ता कट! वैभव सूर्यवंशीला सेहवागचा इशारा

14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयपीएल स्पर्धेत पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपल्या शैलीचं दर्शन घडवलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने स्टारडम डोक्यात जाण्यापूर्वीच त्याचे कान टोचले आहेत.

.. तर आयपीएलच्या पुढच्या पर्वातून पत्ता कट! वैभव सूर्यवंशीला सेहवागचा इशारा
वैभव सूर्यवंशी आणि वीरेंद्र सेहवागImage Credit source: PTI
| Updated on: Apr 25, 2025 | 6:00 PM
Share

आयपीएल स्पर्धेतून भारतीय संघाला नव्या खेळाडूंची फळी तयार करण्यास मदत होते.  यंदाच्या पर्वात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहून त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतलं. 30 लाखांची बेस प्राईस असताना बोली लावली. तसेच 1.10 कोटी रुपये खर्च करून संघात घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण कोट्यधीश बनला. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची खेळी पाहून भविष्यात त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्या डावात 34 धावा केल्या. यावेळी त्याने आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पण त्याचा फॉर्म आणि शैली पाहून वीरेंद्र सेहवागने त्याचे कान टोचले आहेत. चांगल्या सुरुवातीने वाहत जाऊ नको आणि भविष्यावर लक्ष केंद्रित कर, अशा पद्धतीने इशारा दिला.

वीरेंद्र सेहवागने क्रिकबझशी केलेल्या चर्चेत म्हणाला, “अनेक खेळाडूंना एक किंवा दोन चांगले डाव खेळताच आपण स्टार झाल्यासारखे वाटते. पण स्थिरावत नाहीत. जेव्हा ते चांगले खेळतात तेव्हा त्यांची प्रशंसा होते, परंतु जेव्हा ते चांगले खेळत नाहीत तेव्हा त्यांच्यावर टीका होते. हे सर्व समजण्यासारखे आहे आणि कोणत्याही खेळाडूने आपला संयम गमावू नये.” वैभवला 20 वर्षे आयपीएलमध्ये खेळण्याचे ध्येय ठेवून पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला. वैभवला टीम इंडियात इतक्या लवकर स्थान मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्याला देशांतर्गत क्रिकेट आणि फिटनेसवर काम करावं लागणार आहे.

विराट कोहलीचे उदाहरण देत सेहवाग म्हणाला की, “विराटने वयाच्या 19व्या वर्षी आयपीएल खेळायला सुरुवात केली. आता तो आयपीएलच्या 18व्या पर्वात खेळत आहे. सूर्यवंशीनेही त्याच प्रकारे लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण जर तो पदार्पणाच्या खेळीवर समाधानी असेल तर तो पुढच्या वर्षी पुन्हा दिसणार नाही.” रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात वैभवने 12 चेंडूत 16 धावा केल्या पण तो विजय मिळवू शकला नाही. राजस्थानने हा सामना 11 धावांनी गमावला.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.